U19 World Cup 2026 India Begin U19 World Cup With Win vs America U19 : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. झिम्बाब्वेतील बुलावायोच्या क्वीन स्पोर्ट्स क्लब ग्राउंडवर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गोलंदाजीत हेनिल पटेलचा जलवा; फलंदाजीत वैभव सूर्यवंशी ठरला फिका, पण...
हेनिल पटेल याने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना अमेरिकेचा अर्धा संघ एकट्याने तंबूत धाडला. त्याच्या भेदक माऱ्यामुळे अमेरिकेच्या संघाचा डाव १०७ धावांवर आटोपला. हा सामना आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही जोडीच टीम इंडियाला जिंकून देईल, असे वाटत होते. पण दोघेही स्वस्तात माघारी फिरले. पण 'ट्रम्प कार्ड' फसलं, तरीही टीम इंडियाने शेवटी अपेक्षेननुसार 'टॅरिफ' वसूल केलेच.
Vaibhav Suryavanshi Record : U19 वर्ल्ड कपमध्ये वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम; इथंही विक्रमांची ‘वैभवशा...
फलंदाजीत अभिज्ञान कुंडूनं दाखवला क्लास
अमेरिकेच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पावसाच्या व्यत्यामुळे युवा टीम इंडियाला ३७ षटकांत ९६ धावांचे टार्गेट मिळाले होते. वैभव सूर्यवंशी अवघ्या दोन धावांवर त्रिफळाचित झाला. कर्णधार आयुष म्हात्रेनं १९ चेंडूत १९ धावा करून मैदान सोडले. वेदांत त्रिवेदी २ (१०) आणि विहान मल्होत्राही १८(१७) फार काळ मैदानात टिकले नाहीत. अभिज्ञान कुंडू ४२ (४१) आणि कनिष्क चौहान १० (१४) यांनी संघाच्या विजय पक्का केला.
आयुष म्हात्रेचा फॉर्म चिंतेचा विषय
भारतीय संघाला विजय मिळाला असला तरी लिंबू टिंबू संघासमोर फलंदाजीत युवा टीम इंडिया कमी पडल्याचे पाहायला मिळाले. पुढच्या सामन्यात या चुका महागात पडू शकतात. साखळी फेरीत शनिवारी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दुसरा सामना खेळणार असून त्यानंतर संघासमोर न्यूझीलंडचे चॅलेंज असेल. आयुष म्हात्रेचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. जेतेपद मिरवायचे असेल तर त्याला फॉर्मात यावे लागेल. चांगली सुरुवात मिळाल्यावरही तो सातत्याने मोठी खेळी करण्यात अपयशी ठरताना पाहायला मिळाले आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळाले. हा सामना सोपा होता, पण पुढे टिकायचं तर यापेक्षा दमदार खेळ करावा लागेल.