Join us

कोरोना व्हायरसचा फटका; क्रिकेटपटूवर तंबूतच राहण्याची वेळ

कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 12:46 IST

Open in App

कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्याचा खेळाडूंना आर्थिक फटका बसताना दिसत आहे. मुंबईचा 23 वर्षांखालील संघाचा खेळाडू सलमान खान हा त्यापैकी एक... क्रॉस मैदानवरील ग्राऊंड्समनचा तो मुलगा... क्रिकेट स्पर्धाच बंद असल्यानं ग्राऊंड्समनचेही उत्पन्न थांबले आहे. 

21 वर्षी सलमान हा मुंबई प्रीमिअर लीगमध्ये आकाश टायगर्स संघाकडून यंदा खेळणार होता आणि त्याचे त्याला 1 लाख रुपयेही मिळणार होते. या पैशानं भाड्याच्या घरात राहण्याचा त्याचे स्वप्न होतं, परंतु आता लीगच होणार नसल्यानं त्याला ती रक्कमही मिळणार नाही. जवळील पैसेही संपत चालले आहे. अशा परिस्थितीत त्याला तंबूतच रहावे लागत आहे. 

इंडियन एक्स्प्रेसनं हे वृत्त प्रसिध्द केलं आहे. सलमान म्हणाला,''मुंबई प्रीमिअर लीग झाली असती तर मी या तंबूतून भाड्याच्या घरात शिफ्ट झालो असतो. पण, या आजारानं सर्व काही विस्कटवलं. माझ्याकडे नोकरी नाही आणि जवळचे पैसेही संपत आहेत.'' 

धारावीत राहणारा खेळाडू संदीप कोंचिकोर याही मुंबई प्रीमिअर लीगच्या प्रतीक्षेत आहे. तो म्हणाला,''मुंबई प्रीमिअर लीग आणि क्लब क्रिकेटमधून मी 8-9 लाख कमावले असते. पण, आता क्रिकेट नाही म्हणजे मोठं नुकसान.'' 

लॉकडाऊनने काय केली MS Dhoni ची अवस्था; ओळखणंही झालं अवघड!

अनुष्कासोबत लग्न होण्यापूर्वी Virat Kohli होता ब्राझीलियन मॉडलचा प्रेमात!

Corona Virus : Shah Rukh Khanचा संघ करतोय परदेशात गरजूंना मदत 

Well Done Sachin... मुंबईतील 4000 वंचित मुलांसाठी सचिन तेंडुलकरची आर्थिक मदत

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई