क्षेत्ररक्षण करताना टक्कर होऊन जखमी झालेले श्रीलंकेचे दोन खेळाडू 'या' अवस्थेत पोहोचले घरी

विराटने स्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा जोरदार फटका अडवताना बंदारा आणि वँदेरेसे या श्रीलंकेच्या दोन क्षेत्ररक्षकांमध्ये जोरदार टक्कर झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 11:58 IST2023-01-17T11:57:52+5:302023-01-17T11:58:51+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Two Sri Lankan players who were injured in a collision while fielding reached home in 'this' state | क्षेत्ररक्षण करताना टक्कर होऊन जखमी झालेले श्रीलंकेचे दोन खेळाडू 'या' अवस्थेत पोहोचले घरी

क्षेत्ररक्षण करताना टक्कर होऊन जखमी झालेले श्रीलंकेचे दोन खेळाडू 'या' अवस्थेत पोहोचले घरी

अत्यंत एकतर्फी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल ३१७ धावांनी धुव्वा उडवला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत लंकेला ३-० असा क्लीनस्वीप दिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांच्याबाबतीत सर्वात मोठा विजय मिळवताना भारताने न्यूझीलंडचा (आयर्लंडविरुद्ध २९० धावांनी विजय) विक्रम मोडला. तसेच तिनशेहून अधिक धावांनी एकदिवसीय विजय मिळवणारा भारत क्रिकेटविश्वातील पहिला संघ ठरला. 

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने शतकी खेळी केली. तर शुभमन गिलपाठोपाठ विराट कोहलीनेही दमदार शतकी खेळी केली. मात्र विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याने मारलेला एक फटका श्रीलंकेच्या दोन क्षेत्ररक्षकांना जायबंदी करून गेला. विराटने स्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा जोरदार फटका अडवताना बंदारा आणि वँदेरेसे या श्रीलंकेच्या दोन क्षेत्ररक्षकांमध्ये जोरदार टक्कर झाली होती. त्यामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला. तसेच दोन्ही खेळाडूंना स्ट्रेचरवरून बाहेर न्यावे लागले. त्यानंतर आता जखमी खेळाडूंचे फोटो समोर आले आहे.

बंदारा आणि वँदेरेसे या दोन्ही खेळाडूंचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते विमानतळावर दिसत आहेत. दोघांच्या हातात क्रॅचेस होत्या. त्याच्या पायाला पट्टाही बांधला होता. म्हणजेच त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्याला फ्रॅक्चर झाले आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो केव्हा मैदानात परतेल, याची माहितीही अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, रोहित शर्मा ( ४२) व शुभमन यांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. रोहित माघारी परतल्यानंतर शुभमन व विराट यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई सुरू केली. गिलने ९७ चेंडूत ११६ धावांच्या खेळी साकारताना १४  चौकार आणि २ षटकार खेचले. विराटने आज आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७४वे शतक पूर्ण केले आणि वन डे तील हे त्याचे ४६ वे शतक ठरले. यासह त्याने घरच्या मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. विराट आणि शुभमन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. किंग कोहलीने ११० चेंडूंत १३ चौकार व ८ षटकारांसह १६६ धावा चोपल्या. श्रेयस अय्यर (३८) धावांची साजेशी खेळी केली. भारताने ५ बाद ३९० धावांचा डोंगर उभा केला.  

Web Title: Two Sri Lankan players who were injured in a collision while fielding reached home in 'this' state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.