क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम

Heinrich Klaasen Retirement: क्रिकेटवेडे चाहते एक धक्का सहन करत नाही तोच दुसरा धक्का त्यांना बसला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:11 IST2025-06-02T16:11:15+5:302025-06-02T16:11:42+5:30

whatsapp join usJoin us
Two shocks in the cricket world on the same day! After glen Maxwell, another star player heinrich klaasen retires from cricket | क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम

क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलने एकदिवशीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली असून यापुढे तो टी-२० कडे लक्ष देणार आहे. याची घोषणा होत नाही तोच दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनने क्रिकेटलाच रामराम ठोकला आहे. क्रिकेटवेडे चाहते एक धक्का सहन करत नाही तोच दुसरा धक्का त्यांना बसला आहे. 

क्लासेनने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. जानेवारी २०२४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून क्लासेनने निवृत्ती घेतली होती. परंतू, तो टी२० आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत होता. असे असले तरी क्रिकेट साउथ अफ्रीका (CSA)च्या मध्यवर्ती करारातून त्याला वगळण्यात आले होते. यामुळे नाराज असलेल्या क्लासेनने सर्वच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. 

मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णय माझ्यासाठी दुःखाचा दिवस घेऊन आला आहे. भविष्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे ठरवण्यासाठी मला खूप वेळ लागला.कठीण निर्णय होता, पण मी पूर्ण समाधानी आहे. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे, असे क्लासेनने इंस्टाग्रामवर लिहिले आहे. 


या संधीमुळे मी खूप चांगले मित्र जमविले आहेत, हे नाते असेच सांभाळून ठेवेन. क्रिकेटने मला महान लोकांशी ओळख करून दिली ज्यांनी माझे आयुष्य बदलले. मी त्या सर्वांचा मनापासून आभारी आहे, असेही त्याने म्हटले आहे. 

ग्लेन मॅक्सवेलने देखील आज निवृत्ती जाहीर केली. 'खूप विचार केल्यानंतर, मी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन जर्सी परिधान करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. २०१२ मध्ये पदार्पण करण्यापासून ते २०१५ मध्ये घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्यापर्यंत आणि २०२३ मध्ये आणखी एका अविश्वसनीय मोहिमेचा भाग असण्यापर्यंत, मी अशा आठवणी बनवल्या आहेत ज्या माझ्यासोबत कायम राहतील, असे त्याने म्हटले आहे. 

Web Title: Two shocks in the cricket world on the same day! After glen Maxwell, another star player heinrich klaasen retires from cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.