जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा माजी चायनामन गोलंदाज पॉल अॅडम्सने भारतीय संघाचा समतोल खूपच छान आहे, ते एकाच वेळी दोन मनगटाद्वारे फिरकी गोलंदाजी करणा-या खेळाडूंना खेळवत आहेत, तर अन्य दुस-या संघांना एक स्पिनर खेळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
अॅडम्स म्हणाला, ‘‘आपण विद्यमान परिस्थितीत क्रिकेट पाहाल, तर हे फलंदाजीच्या बाजूने आहे. अशा परिस्थितीतही भारताच्या अंतिम संघात चहल आणि कुलदीपने स्थान मिळवले आहे. ते फिरकी गोलंदाजी करताना मनगटाचा उपयोग करतात; परंतु हे दोघेही वेगळ्या प्रकारचे गोलंदाज आहेत. ते चेंडू फलंदाजांपासून खूप दूर काढतात आणि त्यात यशस्वी ठरतात. भारतीय संघ या दोघांना एकाच वेळी खेळवण्यास उत्सुक आहे आणि ते त्यांच्या संघसमतोलास पूरकदेखील आहे. विशेष म्हणजे बरेच संघ अंतिम अकरा जणांत दोन फिरकी गोलंदाजांना स्थान देऊ शकत नाहीत.’’