टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुरुवारी त्यांच्याकडे गुड न्यूज असल्याचे जाहीर केले. 2017 मध्ये विराट-अनुष्कानं इटलीत मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याच्या चर्चा अनेकदा उठल्या. पण, आज दोघांनी अधिकृतपणे त्यांच्या घरी पाहूणा येणार असल्याचे जाहीर केले. 'आम्ही दोनाचे तीन झालोय,' असं दोघांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. जानेवारी २०२१ मध्ये घरी पाळणा हलणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे. त्यांच्या या गूड न्यूजनंतर आता नेटिझन्सने मीम्सचा मास्टर स्ट्रोक मारला आहे.