Join us

Jasprit Bumrah Wedding : जसप्रीत-संजना यांच्या लग्नाच्या चर्चा, सोशल मीडियावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव 

Jasprit Bumrah’s wedding with Sanjana Ganesan : संजना गणेशन स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 15:34 IST

Open in App

टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आणि मॉडेल संजन गणेशन ( Sanjana Ganesan) हे 14-15 मार्चला गोव्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. या दोघांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अजूनही कोणताच अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण, सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होण्यास सुरूवात झाली आहे.

संजना गणेशन स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओत संजना भारतीय गोलंदाजाची मुलाखत घेत आहे.   दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमना परमेश्वरन (  Anupama Parameshwaran) हिच्यासोबत जसप्रीत लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण, अनुपमनाची आई सुनिता यांनी या अफवा असल्याचे स्पष्ट केले. ''अशा नवनवीन चर्चा नेहमी होत असतात. पण, त्या आम्ही सकारात्मकतेनं स्वीकारतो. अनुपना आणि बुमराह यांच्याबद्दल याआधीही अनेक बातम्या आल्या. इंस्टाग्रामवर ही दोघं एकमेकांना फॉलो करतात आणि ज्यांना ते आवडत नाही त्यांच्या सुपीक डोक्यातून अशा बातम्या पसरवल्या जात आहेत,''असे सुनिता यांनी सांगितले.

टॅग्स :जसप्रित बुमराहसंजना गणेशन