Join us

धोनी, धवन, केदारच्या फोटोवरुन चाहते सुसाट; हार्दिक, राहुलची खिल्ली

नेटिझन्सकडून हार्दिक पांड्या, के. एल. राहुल ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 09:33 IST

Open in App

मुंबई: कॉफी विथ करण कार्यक्रमातील विधानांमुळे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल अडचणीत आले आहेत. महिलांबद्दल केलेल्या अपमानजनक विधानांमुळे या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे करणसोबतच्या कॉफीमुळे हार्दिक आणि राहुलचं तोंड पोळल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. एकीकडे हार्दिक आणि राहुलला कॉफी महागात पडली असताना दुसरीकडे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, शिखर धवनसोबत चहा घेत असतानाचा फोटो केदार जाधवनं ट्विटरवर शेअर केला आहे.केदार जाधवनं काल धोनी आणि धवन सोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला. यामध्ये हे तिन्ही क्रिकेटपटू चहाचा आनंद घेताना दिसत आहे. एक कप चहा सर्वकाही ठिक करतो, असं केदारनं या फोटोसोबत म्हटलं आहे. या फोटोचा संबंध अनेकांनी थेट हार्दिक आणि राहुलच्या 'कॉफी विथ करण'शी जोडला आहे. केदारनं धोनी आणि धवनसोबत चहा घेत हार्दिक आणि राहुलच्या 'कॉफी'वर निशाणा साधल्याच्या प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. 

जखमेवर मीठ चोळणं माहीत होतं. पण इथं तर केदार जाधव जखमेवर चहा ओततो आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटरवर अनेकांनी या फोटोबद्दल भाष्य करताना दिल्या. तर ट्रोल करावं, तर केदारसारखं, अशी प्रतिक्रियाही एकानं दिली आहे. तर बरं झालं तुम्ही कॉफी प्यायला नाहीत, असंदेखील एकानं म्हटलं आहे. एक कप चहानं सर्व काही ठिक होतं. पण एक कप कॉफीमुळे सर्व काही बिघडतं, असा टोलादेखील एका ट्विटर युजरनं लगावला आहे. चांगली मुलं कॉफीला नाहीच म्हणतात, अशीही प्रतिक्रियादेखील एकानं दिली आहे. 

टॅग्स :केदार जाधवमहेंद्रसिंह धोनीहार्दिक पांड्यालोकेश राहुलशिखर धवनभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया