अबुधाबीमध्ये रंगणार झटपट ट्वेन्टी-20 लीग

या लीगमध्ये ख्रिस गेल, शाहिद आफ्रिदी, शेन वॉटसन, सुनील नरिन, रशिद खान, अॅल्बी मॉर्केल, डॅरेन सॅमी, लसिथ मलिंगा यांचा समावेश करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 18:19 IST2018-09-26T18:18:30+5:302018-09-26T18:19:31+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Twenty20 League to be played in Abu Dhabi | अबुधाबीमध्ये रंगणार झटपट ट्वेन्टी-20 लीग

अबुधाबीमध्ये रंगणार झटपट ट्वेन्टी-20 लीग

नवी दिल्ली : आता अबुधाबीमध्येही क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आली आहे. ही ट्वेन्टी-20 लीग झटपट म्हणजेच कमी वेळेत खेळवण्यात येणार आहे. ही लीग 4 ते 6 या तीन दिवसांमध्येच आटोपणार आहे. या स्पर्धेत सहा संघांचा सहभाग असणार आहे.

या लीगमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि संयुक्त अरब अमिरातीमधील खेळाडू सहभागी होणार आहेत. या लीगमधील पहिला सामना ऑकलंड एसेस आणि बुस्ट डिफेडर्स या संघात रंगणार आहे. या लीगमध्ये ख्रिस गेल, शाहिद आफ्रिदी, शेन वॉटसन, सुनील नरिन, रशिद खान, अॅल्बी मॉर्केल, डॅरेन सॅमी, लसिथ मलिंगा यांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Twenty20 League to be played in Abu Dhabi