Join us

"माहीने मला सावधपणे डेट करण्याचा सल्ला दिला", अनुष्कासाठी धोनी बनला 'लव्ह गुरू'

टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री अनुष्का सेनने प्रसिद्धी मिळवली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 19:53 IST

Open in App

टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री अनुष्का सेनने प्रसिद्धी मिळवली. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करून अगदी कमी वेळात स्वत:चे स्थान निर्माण केले. अनुष्काचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. 'बालवीर' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. अलीकडेच तिने स्वप्ननगरी मुंबईत एक घर खरेदी केले. आता तिने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबतच्या भेटीबद्दल भाष्य केले आहे. २१ वर्षीय अनुष्काने 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' पॉडकास्टवर बोलताना एक किस्सा सांगितला.

खरं तर अनुष्काने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. २००९ मध्ये 'यहाँ मैं घर घर खेली' मालिकेतून तिने कलाविश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर 'बालवीर', 'देवों के देव महादेव', 'झांसी की रानी' अशा अनेक मालिकांमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. आता कोरियन सिनेसृष्टीत ती पदार्पण करणार आहे. 

अनुष्का सेनने सांगितला किस्सा अनुष्का सेनने सांगितले की, मला सेटवरचा पहिला दिवस आजही आठवतो. असिस्टंट डायरेक्टर म्हणाले होते की, तुला माहीला भेटायचे आहे का? मी लगेच हो बोलले, कारण मला देखील हेच हवे होते. तो माझा आवडता क्रिकेटर आणि आवडता व्यक्ती आहे. मग मी माहीला जाऊन भेटले. तेव्हा माही म्हणाला, "तू कुठली आहेस? मी रांचीचा आहे. तू पण रांचीची आहेस ना?" माहीच्या या शब्दांनी मला आपलेसे केले. 

तसेच मी आणि धोनी दोघेही वर्षातून एकदा तरी भेटतो. तेव्हा अनेक गोष्टींवर चर्चा होते. माही मला माझ्या जीवनातील समस्यांवर मार्गदर्शन करतो. माहीने मला सावधगिरीने डेट करण्यास सांगितले होते, त्याने मला काही टिप्सही दिल्या होत्या, असा खुलासा अनुष्का सेनने केला. 

दरम्यान, अभिनेत्री अनुष्काने अवघ्या २१व्या वर्षी मायानगरी मुंबईत स्वत:चे घर घेतले आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली. अनुष्काने आईवडिलांबरोबरचे नव्या घरातील फोटो शेअर केले होते. "आमचे नवीन घर...सेन फॅमिली...आणखी एक स्वप्न पूर्ण झाले", अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले होते. अनुष्काने याआधी अवघ्या १७व्या वर्षी BMW गाडी खरेदी केली होती. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसेलिब्रिटीऑफ द फिल्डरांची