Join us
Daily Top 2Weekly Top 5

टी-२०त विजयी घोडदौड सुरूच राहील

वन-डे मालिका खिशात घातल्यानंतरही वेलिंग्टनच्या पाचव्या वन-डेत रोहित अ‍ॅन्ड कंपनीचे वर्चस्व कायम राहिले. हॅमिल्टनच्या चौथ्या वन-डेत ढेपाळलेल्या फलंदाजीपासून बोध घेत सुरुवातीच्या घसरगुंडीनंतरही भारताच्या मधल्या फळीने धावा काढून सामना जिंकून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 05:03 IST

Open in App

- व्हीव्हीएस लक्ष्मण वन-डे मालिका खिशात घातल्यानंतरही वेलिंग्टनच्या पाचव्या वन-डेत रोहित अ‍ॅन्ड कंपनीचे वर्चस्व कायम राहिले. हॅमिल्टनच्या चौथ्या वन-डेत ढेपाळलेल्या फलंदाजीपासून बोध घेत सुरुवातीच्या घसरगुंडीनंतरही भारताच्या मधल्या फळीने धावा काढून सामना जिंकून दिला.रायुडूने आधीच्या सामन्यातून चांगलाच बोध घेतल्याचे जाणवले. वेलिंग्टनमध्ये ‘टॉप गियर’मध्ये फटकेबाजी करणाऱ्या या फलंदाजाने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. वन-डे क्रिकेटमध्ये पहिली खेळी करणाºया विजय शंकरचे देखील तंत्रशुद्ध फटके मारून मोलाचे योगदान दिले. रायुडू- विजय यांच्या उपयुक्त भागीदारी पाठोपाठ अष्टपैलू केदार जाधव आणि हार्दिक पांड्या यांनी धावसंख्येला आकार देण्याची जबाबदारी पार पाडली.माझ्या मते सन २०१७ च्या अखेरीस धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यापासून हॅमिल्टनपर्यंत सुरुवातीच्या पडझडीनंतर भारत सुखरुप बाहेर पडल्याचे अभावानेच दिसून आले होते. अशा बिकट स्थितीतून मार्ग काढण्याचा फॉर्म्युला संघाने शोधून काढल्याचे पाहून मी सुखावलो. त्यात विशेष दृष्टिकोन जाणवतो. काही गडी वाचवून ठेवल्यास अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडणे सोपे होते.परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर न्यूझीलंड संघ हताश होतो. घरच्या स्थितीतही संपूर्ण मालिकेदरम्यान त्यांचे फलंदाज चाचपडत राहिले. ही चिंतेची बाब असली तरी भारतीय गोलंदाजी खेळून काढण्याचा मार्ग त्यांना अद्याप सुचलेला नाही. वेगवान गोलंदाज तर त्रास देतातच शिवाय चहलसारखा फिरकीपटू त्यांच्या मधल्या फळीला कायम खिंडार पाडत आहे. त्यामुळेच विश्वचषकात प्रभावी कामगिरीसाठी ट्रेंट बोल्टसारख्या खेळाडूला ताजेतवाने ठेवायला हवे, हे यजमान संघाला कळले असावे.वेलिंग्टनच्या विजयानंतर भारतीय संघ आता टी-२० मालिकेतही विजयी कूच कायम राखण्याच्या मूडमध्ये आहे. अशा सामन्यातून अनेक मॅचविनर तयार होतात, असे वाटते. माझ्या मते विराटच्या अनुपस्थितीत दिनेश कार्तिकने तिसºया स्थानावर फलंदाजीला यायला हवे. कार्तिक, ऋषभ पंत आणि कृणाल पांड्या यांच्यावर विश्वास आणि जबाबदारी सोपवायला हवी.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंड