ठळक मुद्देभारतीय क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर १० गडी राखून मात करत दृष्टिहिनांच्या तिरंगी ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेचे जेतेपद पटकावले.
गोवा: भारतीय क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर १० गडी राखून मात करत दृष्टिहिनांच्या तिरंगी ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेचे जेतेपद पटकावले. भारताचा कर्णधार अजय रेड्डीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामान्यांच्या पहिल्याच षटकांमध्ये श्रीलंकेचा एक फलंदाज बाद करत अजयने आपला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. खेळाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या धक्क्यातून श्रीलंकेच्या संघाला सावरता आले नाही आणि आपले सर्व फलंदाज गमावून त्यांनी २० षटकांमध्ये ११९ धावा केल्या.
भारतीय संघाने आज सलामीला दुर्गा राव आणि अनिल घरिया हि नवीन फलंदाजांची जोडी पाठवली. दोघांनीही नाबाद शतकी भागीदारी करून भारताला सहजपणे १० गडी राखून विजय मिळवून दिला आणि भारताने मालिका विजय साकारला.