Join us

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात ट्रेंट बोल्टचा समावेश

आयपीएलमधील चारवेळचा विजेता मुंबई इंडियन्सने आपल्या वेगवान माऱ्याला अधिक बळकटी देत न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला संघात निवडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 04:20 IST

Open in App

मुंबई : आयपीएलमधील चारवेळचा विजेता मुंबई इंडियन्सने आपल्या वेगवान माऱ्याला अधिक बळकटी देत न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला संघात निवडले. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सने अंकित राजपूतची निवड केली.आयपीएल २०२०साठीची लिलाव प्रक्रिया १९ डिसेंबरला कोलकाता येथे पार पडणार आहे. पण, तत्पूर्वी सहभागी संघ खेळाडूंची अदलाबदल करत असून बुधवारी मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात बोल्टला समाविष्ट केले आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने अंकित रजपूतला आपल्या संघात घेतले आहे.