MS Dhoni Classis Rolce Royse Video : महेंद्रसिंग धोनी हा केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही लाखो लोकांच्या गळ्यातचा ताईत आहे. धोनीला बाईक्स आणि कार खूप आवडतात हे कोणापासूनही लपलेले नाही. त्याच्या गॅरेजमध्ये अनेक विंटेज कार आणि सुपरबाईक पार्क केलेल्या असतात. धोनी अनेकदा रांचीच्या रस्त्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांतून आणि बाईकवरून प्रवास करताना दिसतो. यावेळी तो त्याच्या क्लासिक रोल्स-रॉइससह रांचीच्या रस्त्यावर फेरफटका मारताना दिसला.
सध्या धोनीचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक तरुण चाहता त्याच्या कारच्या मागे धावत असल्याचे दिसून येते आणि जवळचे लोक हा क्षण त्यांच्या मोबाईलमध्ये कैद करताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पाहा व्हिडिओ-
धोनीच्या ऑटोमोबाईल कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर २०२३ मध्ये माजी भारतीय गोलंदाज वेंकटेश प्रसादने धोनीच्या गॅरेजची एक झलक शेअर केली होती. रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे ७० हून अधिक मोटारसायकली आणि सुमारे १५ लक्झरी आणि विंटेज कार आहेत. या कलेक्शनमध्ये कावासाकी निन्जा, डुकाटी, हार्ले डेव्हिडसन आणि अनेक प्रीमियम कार समाविष्ट आहेत.
Web Title: trending video ms dhoni takes vintage rolls royce for a spin in ranchi fans go crazy watch viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.