Travis Head चं आयकॉनिक शतकी सेलिब्रेशन; स्टँडमधील सुंदरीनंही लुटली मैफील (VIDEO)

शतकी खेळीसह ट्रॅविस हेड या खास पक्तींत  जाऊन बसला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:11 IST2026-01-06T12:56:22+5:302026-01-06T13:11:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Travis Head Enters Record Books Hits Joint Most 100s By An Opener In An Ashes Series His Wife Jessica Head And SCG Crowd Give A Standing Ovation For Iconic Innings | Travis Head चं आयकॉनिक शतकी सेलिब्रेशन; स्टँडमधील सुंदरीनंही लुटली मैफील (VIDEO)

Travis Head चं आयकॉनिक शतकी सेलिब्रेशन; स्टँडमधील सुंदरीनंही लुटली मैफील (VIDEO)

ॲशेस कसोटी मालिकेत पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड याने आणखी एक दमदार शतक झळकावले. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवस हेडने गाजवला. त्याने या मैदानातील पहिले वहिले कसोटी शतक साजरे केले. या मालिकेत त्याच्या भात्यातून आलेली ही तिसरी शतकी खेळी ठरली.  १६६ चेंडूत २४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १६३ धावांची खेळी करताना हेडनं खास विक्रमाला गवसणी घातली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सेंच्युरीसह हेडची परफेक्ट ड्युटी, मग पिक्चरमध्ये आली ती ब्युटी

जो रुटच्या शतकी खेळीनंतर इंग्लंडच्या संघ सामन्यात मजबूत स्थितीत वाटत होता. पण हेडनं आपली ड्युटी एकदम परफेक्ट निभावली आणि ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर पलटवार केला. ऐतिहासिक शतकी खेळीनंतर हेडनं बॅटच्या दांड्यावर हेल्मेट ठेवून  आयकॉनिक सेलिब्रेशन साजरे केले. मग कॅमेरा हेडला चीअर करायला स्टेडियमवर उपस्थितीत असलेली त्याची पत्नी जेसिकावर फिरला अन् ती पिक्चरमध्ये आली. SCG वरील पहिल्या वहिल्या शतकानंतर तिच्यासह स्टेडियममध्ये उपस्थितीत चाहत्यांनी हेडला स्टँडिग ओव्हेशन दिल्याचेही पाहायला मिळाले. हा खास नजारा दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

AUS vs ENG Ashes Test : जो रुटनं केली पाँटिंगची बरोबरी; सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक विक्रम धोक्यात!

शतकी खेळीसह ट्रॅविस हेड या खास पक्तींत  जाऊन बसला 

सिडनी कसोटीतील पहिल्या डावात केलेल्या शतकी खेळीसह  हेडने ॲशेस इतिहासातील एका एलिट क्लबमध्ये प्रवेश केला आहे.  मॅथ्यू हेडन, अ‍ॅलिस्टर कुक, मायकेल स्लेटर आणि जॅक हॉब्स यांसारख्या दिग्गज सलामीवीरांचा यादी आता हेडची एन्ट्री मारली. दुसऱ्या दिवसाअखेर ९१ धावांवर नाबाद राहिलेल्या हेडनं तिसऱ्या दिवसाच्या खेळात १०५ चेंडूत शतक साजरे केले. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे १२ वे शतक ठरले.  या डावासह डावखुऱ्या फलंदाज हेडने ऑस्ट्रेलियातील सात वेगवेगळ्या मैदानांवर शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. या खास कामगिरीमुळे त्याने स्टीव्ह वॉ, डेव्हिड वॉर्नर आणि मॅथ्यू हेडन यांच्यासारख्या दिग्गजांच्या एलिट यादीत आपलं स्थान पक्कं केलं आहे. एवढेच नव्हे तर या खेळीदरम्यान हेडने मालिकेत ६०० धावांचा पल्लाही गाठला. ॲशेसच्या इतिहासात हा पराक्रम करणारा तो नववा सलामीवीर ठरला असून, २०१०-११ च्या मालिकेत ७६६ धावा करणाऱ्या अ‍ॅलिस्टर कुकनंतर हा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

Web Title : ट्रेविस हेड के शतक का जश्न, पत्नी ने स्टैंड से बढ़ाया उत्साह।

Web Summary : ट्रेविस हेड ने एशेज टेस्ट में शानदार शतक बनाया और खास अंदाज में जश्न मनाया। उनकी पत्नी जेसिका स्टैंड से उनका हौसला बढ़ाती नजर आईं, जिससे एक खुशनुमा माहौल बन गया। हेड की पारी ने ऑस्ट्रेलिया को मैच में मजबूत स्थिति में पहुंचाया।

Web Title : Travis Head's century celebration steals hearts; wife cheers from stands.

Web Summary : Travis Head scored a brilliant century in the Ashes Test, celebrating with an iconic gesture. His wife, Jessica, was seen cheering him on from the stands, creating a heartwarming moment. Head's innings helped Australia gain a strong position in the match.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.