Dan Christian : RCBच्या पराभवानंतर चाहत्यांनी डॅन ख्रिस्टियनच्या गर्भवती पत्नीला मारले टोमणे, वापरले अपशब्द!

२०११ ते २०२१ या कालावधीत विराट कोहलीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे १४० सामन्यांत नेतृत्व केले आणि त्यापैकी ६६ सामने जिंकले, तर ७० मध्ये पराभव पत्करला. १३९ डावांमध्ये त्यानं ५ शतकं व ३५ अर्धशतकांसह ४१.९९च्या सरासरीनं ४८७१ धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 10:42 AM2021-10-12T10:42:40+5:302021-10-12T10:43:54+5:30

whatsapp join usJoin us
Toxic Virat Kohli 'Fans' Trolled Dan Christian's Pregnant Partner After Losing IPL Eliminator | Dan Christian : RCBच्या पराभवानंतर चाहत्यांनी डॅन ख्रिस्टियनच्या गर्भवती पत्नीला मारले टोमणे, वापरले अपशब्द!

Dan Christian : RCBच्या पराभवानंतर चाहत्यांनी डॅन ख्रिस्टियनच्या गर्भवती पत्नीला मारले टोमणे, वापरले अपशब्द!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता नाइट रायडर्सनं  ( Kolkata Knight Riders) सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला ( Royal Challengers Bangalore ) पराभूत करून विराट कोहलीचे आयपीएल २०२१ जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. एलिमिनेटर सामन्यात RCBचं १३९ धावांचे लक्ष्य KKRनं ४ विकेट्स राखून पार केले आणि क्वालिफायर २मध्ये प्रवेश केला. ९ वर्ष RCBचे नेतृत्व सांभाळूनही विराटची जेतेपदाची पाटी कोरीच राहिल्यामुळे त्याचे चाहते भडकले अन् गोलंदाज डॅन ख्रिस्टियन ( Dan Christian ) याच्यावर खालच्या शब्दात टीका केली. चाहत्यांनी डॅनच्या गर्भवती पत्नीच्या सोशल अकाऊंटवरही टोमणे मारले आणि अपशब्द वापरले.

ऑस्ट्रेलियन गोलंदाज डॅनची एक ओव्हर RCBला महागात पडली. गोलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या सुनील नरीननं ( ४-२१) फलंदाजीला मैदानावर येताच डॅनच्या षटकात पहिल्या तीन चेंडूंवर खणखणीत षटकार खेचून २२ धावा कुटल्या. तिथेच RCBच्या हातून सामना निसटला. तरीही अखेरच्या षटकापर्यंत सामन्याची चुरस कायम राहिली होती. डॅननं  १.४ षटकांत २९ धावा दिल्या. RCBच्या पराभवानंतर विराटच्या चाहत्यांनी डॅनला टार्गेट केलं.  



डॅननं इंस्टाग्राम पोस्ट लिहिताना याची माहिती दिली आणि त्यानं ट्रोलर्सना असं करू नका अशी विनंती केली. 


RCB vs KKR सामन्यात काय झालं?
आजच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल बाजूने लागताच विराटनं फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, ० बाद ४९ वरून RCBची गाडी घसरली ती पुन्हा ट्रॅकवर आलीच नाही. KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं गोलंदाजांचा योग्य वापर करून घेताना RCBच्या धावांना लगाम लावला. विराट कोहली ( ३९) आणि देवदत्त पडिक्कल ( २१) हे सलामीवीर वगळले तर RCBचे स्टार आज जमिनीवर आपटले. सुनील नरीननं RCBला मोठे धक्के देताना के भरत, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स व ग्लेन मॅक्सवेल यांची विकेट घेतली. नरीननं २१ धावांत ४ , तर ल्युकी फर्ग्युसननं ३० धावांत २ विकेट्स घेत RCBला ७ बाद १३५ धावांवर रोखले. 

शुबमन गिल ( २९)  व वेंकटेश अय्यर ( २६) यांनी कोणताही धोका न पत्करता सावध खेळ करून पहिल्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. पण, हर्षल पटेल व युझवेंद्र चहल यांनी KKRला धक्के देण्यास सुरुवात केले. नितीश राणा ( २३) चुकीचा फटका मारून बाद झाला. सुनील नरीननं मैदानावर येताच सलग तीन षटकार खेचून KKRवरील दडपण कमी केलं, परंतु मोक्याच्या वेळेला तोही बाद झाला. मोहम्मद सिराजनं १९व्या षटकात दिलेले दोन धक्के RCBला विजय मिळवून देणारे ठरतात, असे वाटू लागले. पण, इयॉन मॉर्गन व शाकिब अल हसन यांनी संयमी खेळ करताना KKRचा विजय पक्का केला. सिराज, हर्षल व युझवेंद्र यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
 

Web Title: Toxic Virat Kohli 'Fans' Trolled Dan Christian's Pregnant Partner After Losing IPL Eliminator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.