Join us

टॉसचा ड्रामा; धोनीनं मांजरेकरांना केलं कन्फ्युज, पाहा व्हिडीओ

आयपीएल 11व्या पर्वाची अंतिम रंगत सध्या वानखेडेवर सुरू आहे. अनेकांना उत्कंठा लागून राहिलेल्या सामन्यात अनेक रोमांचक किस्से घडत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 21:58 IST

Open in App

मुंबई- आयपीएल 11 पर्वाची अंतिम रंगत सध्या वानखेडेवर सुरू आहे. अनेकांना उत्कंठा लागून राहिलेल्या सामन्यात अनेक रोमांचक किस्से घडत आहेत. या अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी नाणेफेक जिंकून सनरायजर्स हैदराबादला पहिल्यांदा फलंदाजीचं निमंत्रण दिलं. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या आयपीएलच्या अंतिम सामन्यात एक मजेशीर प्रसंग घडला आहे. हा टॉसचा ड्रामा पाहून प्रेक्षकही काही वेळासाठी का होईना अवाक् झालेत.झालं असं की, धोनीनं नाणेफेकीसाठी नाणे उडवले. त्याच वेळी हैदराबादचा कर्णधार विल्यम्सननं टेल म्हटलं. त्याच वेळी माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकरांनी धोनीला विचारलं, तुम्ही हेड म्हणालात ?, त्याला धोनीनंही लागलीच नाही असं उत्तर दिलं. मी नव्हे, तर त्याने(विल्यम्सन) टेल म्हटलं. तरीही मांजरेकर म्हणाले, हो, तुम्ही हेडच म्हणालात. त्याच वेळी धोनी म्हणाला- नाही, त्यानं टेल म्हटलं. काही वेळासाठी मैदानावर हेड आणि टेलची गोंधळ सुरूच होता.धोनी त्याच्या जागेवर बरोबर होता. तो वारंवार विल्यम्सननं टेल म्हटल्याचं सांगत होता. या प्रकारामुळे 2011च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचा बाका प्रसंग डोळ्यांसमोर तरळला. त्यावेळी सुद्धा मैदानावर धोनी टॉससाठी आला होता. धोनीलाही हा प्रसंग आठवल्यानंतर हसू आवरता येत नव्हते. 

टॅग्स :आयपीएल 2018