Join us  

टी-10 लीगमध्ये उतरणार दिग्गज खेळाडूंची फौज

पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे नवाब शाहजी उल मुल्क टी-10 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 4:54 PM

Open in App

दुबई : पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे नवाब शाहजी उल मुल्क टी-10 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहेत. 

21 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथील शाहजाह क्रिकेट स्टेडियमवर टी-10 क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद चाहत्यांना लुटता येणार आहे. भारतातील क्रिकेट चाहत्यांना सोनी लाईव्हवर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची या लीगला मान्यता असून 2017 मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे या लीगचा पहिला हंगाम खेळवण्यात आला होता.आठ संघांमध्ये जेतेपदाची चुरसया लीगचा पहिला हंगाम चार दिवसच खेळवण्यात आला होता, परंतु आता ही स्पर्धा 10 दिवस चालणार आहे. 8 संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून एकूण 29 सामने खेळवण्यात येतील. या स्पर्धेत केरळा किंग्ज, पंजाब लीजंड्स, मराठा अरेबियन्स, बंगाल टायगर्स, दी कराचियन्स, राजपूत्स, नॉर्दर्न वॉरियर्स आणि पखतून्स हे आठ संघ सहभागी झाले आहेत. यंदाच्या हंगामात कराचियन्स आणि नॉर्दर्न वॉरियर्स हे दोन नवीन संघ सहभागी झाले आहेत.

दिग्गजांची फौजया लीगमध्ये भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याच्यासह पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदी, माजी कर्णधार शोएब मलिक, वेस्ट इंडिजचे सुनील नरीन व डॅरेन सॅमी, इंग्लंडचा इयॉन मॉर्गन आणि अफगाणिस्तानचा रशिद खान हे खेळाडू सहभागी होणार आहेत.  

टॅग्स :आयसीसी