Viral Video: धावताना फलंदाजाच्या खिशातून काय पडलं बघा? पाहून सगळेच शॉक, उलट- सुलट चर्चांना उधाण

County Championship Viral Video: फलंदाजाच्या खिशामधून एक गोष्ट खाली पडली की, पाहून सगळ्यांना धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 15:50 IST2025-05-05T15:46:02+5:302025-05-05T15:50:58+5:30

whatsapp join usJoin us
Tom Bailey drops mobile phone while batting during County Championship match, Video Goes Viral | Viral Video: धावताना फलंदाजाच्या खिशातून काय पडलं बघा? पाहून सगळेच शॉक, उलट- सुलट चर्चांना उधाण

Viral Video: धावताना फलंदाजाच्या खिशातून काय पडलं बघा? पाहून सगळेच शॉक, उलट- सुलट चर्चांना उधाण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेटच्या मैदानात वागण्याचे काही नियम असतात, पण आता क्रिकेटच्या मैदानात नको ती गोष्ट घडली. फलंदाज धाव घेत असताना त्याच्या खिशातून असे काही पडले की, पाहून सर्वानांच धक्का बसला आहे.   त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

काउंटी चॅम्पियनशिपमध्ये हा प्रकार घडला. लँकेशायरचा गोलंदाज टॉम बेली फलंदाजीसाठी आला. एका चेंडूवर दुहेरी धाव घेण्यासाठी धावताना त्याच्या खिशातून मोबाईल पडला. हे पाहून पंचासह मैदानातील प्रेक्षकही चकीत झाले. टॉम बेलीच्या खिशातून मोबाईल पडल्याचे पाहताच समालोचकांनाही हसू अनावर झाले.

महत्त्वाचे म्हणजे, सामना संपेपर्यंत खेळाडूंना फोन वापरण्याची किंवा खिशात फोन ठेवण्याची परवानगी नाही. स्पॉट फिक्सिंगसारख्या घटना कमी करण्यासाठी नियम अधिक कडक करण्यात आले असताना हा प्रकार घडला. फोन खिशात ठेवल्याबद्दल टॉम बेलीवर काही कारवाई केली जाईल की नाही हे अद्याप समजू शकले नाही. या सामन्यात ३१ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या आणि १० व्या क्रमांकावर फलंदाजी करताना लँकेशायरला ४५० धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली.

Web Title: Tom Bailey drops mobile phone while batting during County Championship match, Video Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.