युसूफची राजकारणात एन्ट्री! मोठ्या बंधूला इरफानच्या 'भारी' शुभेच्छा; लोकसभेला रिंगणात

TMC Candidate List: लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व ४२ उमेदवारांची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 04:13 PM2024-03-10T16:13:51+5:302024-03-10T16:15:15+5:30

whatsapp join usJoin us
TMC Candidate List, Lok Sabha Election 2024 Trinamool Congress has given ticket to ex-cricketer Yusuf Pathan from Berhampur, Specially posted by Irfan Pathan | युसूफची राजकारणात एन्ट्री! मोठ्या बंधूला इरफानच्या 'भारी' शुभेच्छा; लोकसभेला रिंगणात

युसूफची राजकारणात एन्ट्री! मोठ्या बंधूला इरफानच्या 'भारी' शुभेच्छा; लोकसभेला रिंगणात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व ४२ उमेदवारांची घोषणा केली आहे. माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीचा उमेदवार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी बहरमपूरमधून निवडणूक लढवत आहेत. अशा परिस्थितीत यावेळी अधीर रंजन यांचा सामना बहरामपूरमध्ये युसूफ पठाणशी होणार आहे. बंगालच्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीने महुआ मोईत्रा यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेच्या ४२ जागांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यांनी सांगितले की, आसनसोलमधून लोकसभेसाठी टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा असतील. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे.  त्यासोबतच टीएमसी आसाम आणि मेघालयमध्येही निवडणूक लढवणार आहे. आपल्या मोठ्या भावाने राजकारणात पाऊल ठेवताच इरफान पठाणने युसूफला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. 

मोठ्या बंधूसाठी इरफानने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, तुझा संयम, दयाळूपणा, गरजूंना मदत आणि कोणतेही पद नसतानाही तू लोकांची सेवा करत आला आहेस. मला विश्वास आहे की, तू एकदा राजकारणात पाऊल टाकले की लोकांच्या दैनंदिन जीवनात खरोखरच बदल घडवून आणशील. 

TMC उमेदवार खालीलप्रमाणे -

  1. कूच बिहार-जगदीश सी बसुनिया
  2. अलीपुरद्वार- प्रकाश चिक बडाइक
  3. जलपाईगुडी-निर्मल चौधरी रॉय
  4. दार्जिलिंग- गोपाल लामा
  5. रायगंज- कृष्णा कल्याणी
  6. बालूरघाट- बिप्लब मित्र
  7. मालदा उत्तर- प्रसून बॅनर्जी
  8. मालदा दक्षिण - शाहनवाज अली रैहान
  9. जंगीपूर- खलीलुर रहमान
  10. बहरामपूर- युसूफ पठाण
  11. मुर्शिदाबाद – अबू ताहेर खान
  12. कृष्णनगर- महुआ मोईत्रा
  13. राणाघाट- मुकुट मणि अधिकारी
  14. बोंगाव- विश्वजित दास
  15. बॅरकपूर-पार्थ भौमिक
  16. दम दम - सौगता रॉय
  17. बारासात- काकोली घोष दस्तीदार
  18. बशीरहाट- हाजी नुरुल इस्लाम
  19. जयनगर- प्रतिमा मंडळ
  20. मथुरापूर- बापी हलदर
  21. डायमंड हार्बर- अभिषेक बॅनर्जी
  22. जाधवपूर- सयानी घोष
  23. कोलकाता दक्षिण- माला रॉय
  24. कोलकाता उत्तर- सुदीप बॅनर्जी
  25. हावडा- प्रसून बॅनर्जी
  26. उलुबेरिया- सजदा अहमद
  27. श्रीरामपूर- कल्याण बॅनर्जी
  28. हुगळी- रचना बॅनर्जी
  29. आरामबाग- मिताली बाग
  30. तमलूक- देवांशू भट्टाचार्य
  31. कंठी - छान बारीक
  32. घाटाळ-देव
  33. झारग्राम- कालीपद सोरेन
  34. मेदिनीपूर - जून मलिया
  35. पुरुलिया- शांतीराम महत
  36. बांकुरा- अरुप चक्रवर्ती
  37. बर्दवान पूर्व – डॉ. शर्मिला सरकार
  38. बर्दवान दुर्गापूर - कीर्ती आझाद
  39. आसनसोल- शत्रुघ्न सिन्हा
  40. बोलपूर – असित मल
  41. बीरभूम- शताब्दी रॉय
  42. विष्णुपूर- सुजाता मंडल खान

Web Title: TMC Candidate List, Lok Sabha Election 2024 Trinamool Congress has given ticket to ex-cricketer Yusuf Pathan from Berhampur, Specially posted by Irfan Pathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.