बुमराहने दिलेल्या टिप्सचा लाभ होत आहे : नमन तिवारी

शोएब अख्तरचा वेग, डेल स्टेनचा स्विंग आणि मिचेल स्टार्कची आक्रमकता मला आवडते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 06:03 AM2024-02-10T06:03:21+5:302024-02-10T06:05:01+5:30

whatsapp join usJoin us
Tips given by Bumrah are benefiting: Naman Tiwary | बुमराहने दिलेल्या टिप्सचा लाभ होत आहे : नमन तिवारी

बुमराहने दिलेल्या टिप्सचा लाभ होत आहे : नमन तिवारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बेनोनी : आक्रमक गोलंदाजीच्या बळावर १९ वर्षांखालील विश्वचषकात आकर्षण ठरलेला वेगवान गोलंदाज नमन तिवारी याने विश्वचषकापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत अनुभवी जसप्रीत बुमराह याच्याकडून ‘टिप्स’ घेतल्या होत्या. त्यामुळे उत्कृष्ट आणि भेदक मारा करण्यास लाभ झाल्याचे नमनचे मत आहे. लखनौ येथील नमनने आयर्लंडविरुद्ध चार बळी घेत विजयात मोलाची भूमिका बजावली होती.  त्याचे याॅर्कर आणि चेंडूतील वेग यांची चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी होणाऱ्या फायनलची तयारी करीत असलेला नमन म्हणाला, ‘बुमराह आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहे.  त्याच्या गोलंदाजीचे व्हिडीओ वारंवार बघतो. एनसीएत बुमराहची अनेकदा भेट झाली. प्रत्येकवेळी त्याच्याकडून मानसिकता आणि कौशल्य याविषयी टिप्स घेतो.  त्याने जे काही शिकविले ते आता माझ्या कामात येत आहे.’

१८ वर्षांचा नमन पुढे म्हणाला, ‘ यॉर्कर कसा टाकायला हवा, यावर बरीच मेहनत घेतली.  आक्रमकता ओतण्याचे काम केले. मी प्रत्येक गोलंदाजाकडून काही नवे शिकतो.  शोएब अख्तरचा वेग, डेल स्टेनचा स्विंग आणि मिचेल स्टार्कची आक्रमकता मला आवडते. मी खरेतर फलंदाज बनू इच्छित होतो.

कसोटी गोलंदाज व्हायचेय!
नमनला भविष्यात कसोटी गोलंदाज बनायची इच्छा आहे.  त्यासाठी चेंडूतील वेग वाढविण्यावर त्याचा भर आहे.  वरिष्ठ संघातून खेळण्यासह विश्वचषकदेखील खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे. ‘गोलंदाजांची खरी परीक्षा कसोटी सामन्यातच होत असल्याने मला कसोटी गोलंदाज बनायचे आहे. त्यासाठी कठोर मेहनत घेत राहीन,’ असे नमन म्हणाला. 

Web Title: Tips given by Bumrah are benefiting: Naman Tiwary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.