- अयाझ मेमन (कन्सल्टिंग एडिटर लोकमत)
कल्पना करा की तुम्ही आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याच्या जागी आहात, सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने ओव्हल, अॅडिलेड वर दुसऱ्या कसोटीत ३०० पुर्ण केले आहेत. तो ब्रायन लाराचा विक्रम नक्कीच मोडु शकतो. पाकिस्तानची गोलंदाजी ढासळली आहे. सामन्यात पुरेसा वेळ देखील आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल.
वॉर्नरने ३०० पुर्ण केल्यावर मी टिष्ट्वट करून माझ्या फॉलोअर्सला त्यांचे मत विचारले. आॅस्ट्रेलियाने आधीच एक विशाल स्कोअर केल्याने पेनने डाव घोषित करावा की वॉर्नरने लाराला मागे टाकण्यासाठी खेळु द्यावे, हा विक्रम मोडण्यासाठी त्याला पुरेसा वेळ द्यावा.
केवळ १७ टक्के लोकांनी पेनने तात्काळ जाहीर करावे, असे सुचवले तर वॉर्नरला लाराचा विक्रम मोडण्याची संधी द्यावी, असे असे मत ७६ टक्के लोकांनी दिले. ७ टक्के लोकांनी म्हटले की त्याला भरपूर वेळ द्यायला हवा. पेन याने ३ बाद ५८८ वर डाव घोषित केला त्यावेळी वॉर्नर ३३५ धावांवर खेळत होता. त्याचा स्ट्राईक रेट ८०.१४ होता. अशा वेळी त्याला लाराचा विक्रम मोडण्यासाठी जास्त वेळ लागला नसता. वॉर्नर एक महत्त्वाचा फलंदाज आहे. त्याने अॅशेसमध्ये संघर्ष केला. अशा वेळ त्याला या संधीचा निश्चीत फायदा झाला असता.
क्लार्कच्या नजरेसमोर लाराचा ४०० धावांचा विक्रम असेलच, मात्र त्याने देखील टेलरप्रमाणेच डाव घोषित करण्याचा मार्ग निवडला अन्यथा तो सहज ब्रॅडमन यांच्या ३३४ धावांच्या विक्रमाला मोडु शकला असता. याला एक अपवाद आहे. तो म्हणजे मॅथ्यु हेडन याने झिम्बाब्वे विरोधात ३८० धावा केल्या होत्या. त्यावेळी संघाचा कर्णधार स्टिव्ह वॉ होता. हेडनने लाराच्या ३७५ धावांच्या विक्रमाला गवसणी घातली होती.
अशा गुंतागुतींच्या प्रसंगात कर्णधार आपल्या ड्रेसिंग रुममधील दोन संघांची ताकद कशी पाहतो आणि सामन्याचे कसे आकलन करतो यावर निर्णय अवलंबून असतात. पेनची घोषणा वादविवादास्पद आहे. मात्र जर त्याच्या या निर्णयाचे ड्रेसिंग रुममध्ये आणि विशेषता: वॉर्नरने कौतुक केले तरच तो निर्णय योग्य ठरेल.