Tim David Broke Virat Kohli Record : बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. परिणामी हा सामना प्रत्येकी १४-१४ षटकांचा खेळवण्यात आला. पावसामुळे बंगळुरुची खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक झाली होती. याचा पंजाबच्या गोलंदाजांनी पुरेपूर फायदा उठवला. पण टीम डेविड याने संघ संकटात असताना आव्हानात्मक खेळपट्टीवर आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. या अर्धशतकी खेळीसह त्याने संघाची मोठी नाच्चकी टाळलीच. याशिवाय विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढत नवा इतिहासही रचला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अन् टीम डेविडनं रचला इतिहास
पंजाबच्या संघासमोर आरसीबीचा संघ निच्चांकी धावसंख्येत आटोपतोय की, काय अशी भिती निर्माण झाली होती. ४२ धावांत आरसीबीच्या संघाने ७ विकेट्स गमावल्या होत्या. या बिकट परिस्थितीतून संघाला बाहेर काढताना टीम डेविडनं २६ चेंडूत ५० धावांची नाबाद खेळी केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना संघाच्या धावफलकावर शंभरीच्या आत धावसंख्या असताना अर्धशतक झळकवणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
विराट कोहलीचा विक्रम मोडला
पहिल्यांदा फलंदाजी करताना कमी धावसंख्या असताना अर्धशतक झळकवण्याचा विक्रम या आधी किंग कोहलीच्या नावे होता. २०१३ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आरसीबीच्या संघाने २ बाद १०६ धावा केल्या होत्या. यावेळी कोहलीच्या भात्यातून २९ चेंडूत ५६ धावांची खेळी आली होती. टीम डेविडनं संघाच्या धावफलकावर ९५ धावा असताना अर्धशतक झळकावत कोहलीचा १२ वर्षांपासून अबाधित असणारा विक्रम मोडीत काढला.