Join us

"मी रोहितच्या लेकीला प्रॉमिस केलंय की...", अनोख्या सेलिब्रेशनबद्दल तिलक वर्माचा खुलासा

Tilak Varma Dedicated His Celebration To Rohit Sharma Daughter : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. 

By ओमकार संकपाळ | Updated: August 7, 2023 12:56 IST

Open in App

tilak varma, ind vs wi : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. सलामीचे दोन्ही सामने जिंकून यजमान विडिंजच्या संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील टीम इंडियावर मालिका गमावण्याचे सावट आहे. मालिका खिशात घालण्यासाठी आगामी तिन्ही सामने जिंकणे भारतासाठी गरजेचे आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर सर्वांना प्रभावित करणाऱ्या तिलक वर्माने काल देखील चमकदार कामगिरी केली. तिलकने अर्धशतकी खेळी करून यजमान संघासमोर सन्मानजनक धावसंख्या उभारली. 

सलामीच्या सामन्यात (३९) धावा करणाऱ्या तिलकने दुसऱ्या ट्वेंटी-२० मध्ये ५१ धावांची खेळी केली. ४१ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने अर्धशतक पूर्ण केले. आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तिलकने पॅव्हेलियनकडे बोट दाखवत अनोखे सेलिब्रेशन केले. ज्याचा खुलासा देखील त्याने सामना झाल्यानंतर केला आहे.   

तिलक वर्माचे अनोखे सेलिब्रेशन दुसरा ट्वेंटी-२० सामना संपल्यानंतर तिलक वर्माने सांगितले की, माझ्या या अनोख्या सेलिब्रेशनचे कारण रोहित शर्माची मुलगी समायरा आहे. मी तिला प्रॉमिस केलंय की, जेव्हा मी आंतरराष्ट्रीय शतक किंवा अर्धशतक झळकावेन तेव्हा मी याच पद्धतीने सेलिब्रेशन करेन. हे फक्त 'सॅमी'साठी होते. 

भारताचा सलग दुसरा पराभव पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार हार्दिक पांड्याला भोवला. पण, तिलक वर्माने अर्धशतक झळकावून संघाची लाज राखली. टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाने १८.५ षटकांतच लक्ष्य गाठले अन् २ गडी राखून विजय मिळवला.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App