थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघूचे योगदान प्रशंसनीय- विराट कोहली

बांगलादेशचा स्टार फलंदाज तमीम इक्बालसोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह सत्रात बोलताना कोहली म्हणाला, ‘माझ्या मते, या भारतीय संघाने २०१३ पासून वेगवान गोलंदाजीला सामोरे जाताना दाखविलेली सुधारणा केवळ रघूमुळे (राघवेंद्र) आहे. ’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 01:30 AM2020-05-20T01:30:57+5:302020-05-20T01:31:15+5:30

whatsapp join usJoin us
Throwdown specialist Raghu's contribution is commendable - Virat Kohli | थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघूचे योगदान प्रशंसनीय- विराट कोहली

थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघूचे योगदान प्रशंसनीय- विराट कोहली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या मते थ्रोडाऊन स्पेशालिस्ट डी. राघवेंद्र साईडआर्मने थ्रो करताना १५०-१५५ किमी प्रति तासपेक्षा अधिक वेगाने चेंडू टाकत असल्यामुळे भारतीय फलंदाजांची अलीकडच्या कालावधीत वेगवान गोलंदाजांविरुद्धच्या कामगिरीत सुधारणा करण्यास मदत झाली.
बांगलादेशचा स्टार फलंदाज तमीम इक्बालसोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह सत्रात बोलताना कोहली म्हणाला, ‘माझ्या मते, या भारतीय संघाने २०१३ पासून वेगवान गोलंदाजीला सामोरे जाताना दाखविलेली सुधारणा केवळ रघूमुळे (राघवेंद्र) आहे. ’
कोहली म्हणाला, ‘मला स्वत:बाबत कधी शंका नसते. दडपण असलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतानाही माझी मानसिकता तशीच असते. प्रामाणिकपणे सांगयाचे झाल्यास सामन्यादरम्यान मला कधीच शंका नसते. प्रत्येक व्यक्तीची कमकुवत बाजू असते. त्यामुळे दौऱ्यावर असताना सरावादरम्यान जर तुमचे सत्र चांगले गेले नाही तर तुम्हाला वाटते की फॉर्मात नाही. ’
लक्ष्याचा पाठलाग करण्यात माहीर कोहली म्हणाला, बालपणी भारतीय संघाचे सामने बघून मला वाटायचे की मी संघाच्या विजयासाठी उपयुक्त ठरू शकतो. मी लहान असताना भारतीय संघाचे सामने बघत होतो. संघ पराभूत झाल्यानंतर झोपताना विचार करीत होतो की मी सामना जिंकून देऊ शकलो असतो. जर ३८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मला असे कधीच वाटत नाही की लक्ष्य गाठता येणार नाही.
२०११ मध्ये होबार्टमध्ये पात्रता गाठण्यासाठी आम्हाला ४० षटकांत ३४० धावा करायच्या होत्या. ब्रेकदरम्यान मी सुरेश रैनाला म्हणालो की, आपण ही लढत २० षटकांची असल्याप्रमाणे खेळू. ४० षटके मोठा टप्पा आहे. त्यामुळे सुरुवातीला २० षटके खेळत किती धावा होतात हे बघू. त्यानंतर दुसरा टी-२० सामना खेळू.’
क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक कोहली म्हणाला, आपल्या गरजेनुसार फलंदाजीमध्ये बदल करावा लागला. त्यात चेंडूला हवेत मारण्याऐवजी जमिनीलगत फटके खेळण्याचा समावेश आहे. मी बदल केला. कारण मी मैदानी फटके खेळण्यास इच्छुक होतो. माझ्याकडे मर्यादित पर्याय होते. जर तुमचा समतोल योग्य असेल तर तुम्ही कुठलाही फटका खेळू शकता, असे माझे मत आहे. माझी स्थिती माझ्यासाठी अनुकूल नव्हती.’
कोहली पुढे म्हणाला, ‘हा मुद्दा मात्र अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाचा ठरतो. सचिन तेंडुलकर यांचा स्टान्स जीवनभर स्थिर होता आणि त्यांना कुठली अडचण आली नाही. त्यांचे तंत्र शानदार होते. हॅण्ड-आय कॉर्डिनेशनही चांगले होते. मला माझ्या आवश्यकतेनुसार बदल करावा लागला. मी फलंदाजीमध्ये अनेक बाबींचा अवलंब केला. कारण त्याशिवाय तुम्हाला काय योग्य, काय अयोग्य याची कल्पना येत नाही. खेळाडू जोपर्यंत सामन्यामध्ये नव्या बाबीची चाचणी घेत नाही तोपर्यंत तो परफेक्ट होऊ शकत नाही.’
दरम्यान, तयारीबाबत बोलताना कोहली म्हणाला, माझा आहार व फिटनेससाठी नियोजनबद्ध निकषाचा आधार घेतो. (वृत्तसंस्था)
- साईडआर्म एक क्रिकेट उपकरण आहे. ते लांब चमच्याप्रमाणे असते. त्याचा एक भाग चेंडू पकडण्यासाठी व वेगाने फेकण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने तयार करण्यात येतो.
कोहली म्हणाला, ‘खेळाडूंचे फूटवर्क, बॅटची मूव्हमेंट याबाबत त्याला चांगली समज आहे. त्याने आपल्या तंत्रात सुधारणा करताना साईडआर्मने तो सहजपणे १५५ किमी प्रति तास वेगाने चेंडूफेक करू शकतो. नेटमध्ये रघूला खेळल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सामना खेळता त्यावेळी तुम्हाला वाटते की चेंडू खेळण्यासाठी तुमच्याकडे बराच वेळ आहे.’
राघवेंद्र अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफचा महत्त्वाचा सदस्य आहे, याचे आश्चर्य वाटायला नको.

Web Title: Throwdown specialist Raghu's contribution is commendable - Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.