RCB announce Rs 25 lakh financial aid for families of Bengaluru stampede victims : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील फायनल लढत जिंकत १७ वर्षांचा दुष्काळ संपवत पहिली वहिली ट्रॉफी जिंकली. पण नरेंद्र मोदी स्टेडियमवरील विजयी कामगिरीचा बंगळुरुच्या घरच्या मैदानात विजयी जल्लोष साजरा करताना मोठी अन् मनाला हेलावून टाकणारी दुर्घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या दुर्घटनेत ११ RCB चाहत्यांनी गमावला होता जीव
४ जूनला बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर IPL चॅम्पियन्स RCB संघाचे जंगी स्वागत करण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. लाखोच्या संख्येनं चाहता स्टेडियम परिसरात आला होता. या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांनी आपला जीव गमावला होता. या घटनेच्या ३ महिन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रँचायझीनं दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
भावूक पोस्ट शेअर करत RCB कडून पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात
आरसीबीने सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक पोस्ट लिहित, आनंदाच्या क्षणी दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी २५-२५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. RCB कुटुंबियातील ११ सदस्यांना आपण गमावले. ते आमच्या कुटुंबाचा एक भाग होते. प्रत्येकाच्या आठवणींत कायम आपल्यासोबत असतील. कोणत्याही प्रकारे त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. RCV आदरपूर्वक त्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी २५ लाखांची मदत देत आहोत. ही फक्त आर्थिक मदत नसून, कृतज्ञका, एकता आणि सातत्यपूर्ण काळजी घेण्याचे वचनबद्धता आहे, असा उल्लेख रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फ्रँचायझीनं शेअर केलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.