'या' क्रिकेटपटूंच्या पत्नीही आहेत बिझनेसवूमन

प्रत्येक क्रिकेटपटूची पत्नी ही चूल आणि मुल सांभाळत नाही, तर त्या बिझनेसवूमनही आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 19:53 IST2019-03-06T19:47:02+5:302019-03-06T19:53:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
'These' are the wives of cricketers are powerful businesswomen | 'या' क्रिकेटपटूंच्या पत्नीही आहेत बिझनेसवूमन

'या' क्रिकेटपटूंच्या पत्नीही आहेत बिझनेसवूमन

मुंबई : क्रिकेटपटूंच्या पत्नी त्यांचे सामने पाहायला येतात. त्यांनी चीअर करतात आणि त्याचवेळी प्रकाशझोतात येतात. त्यावेळी काही जणांचे म्हणणे असते की या क्रिकेटपटूंच्या पत्नींचे कतृत्व काय? पण प्रत्येक क्रिकेटपटूची पत्नी ही चूल आणि मुल सांभाळत नाही, तर त्या बिझनेसवूमनही आहेत. हे ऐकल्यावर कदाचित तुम्हाला धक्का बसेल. पण काही क्रिकेटपटूंच्या पत्नींचे बिझनेस आहेत आणि त्यामध्ये त्या यशस्वीही झालेल्या पाहायला मिळत आहेत.

अनुष्का शर्मा

 भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा एक बॉलीवूडमधील अभिनेत्री आहे. अनुष्का ही एक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असली तरी ती एक बिझनेसवूमन आहे. कारण 'क्लीन स्लेट' नावाचे प्रोडक्शन हाऊस हे अनुष्काचे आहे. 'क्लीन स्लेट'ने आतापर्यंत ‘एनएच10’, ‘फिल्लौरी’ आणि  ‘परी’ हे सिनेमे बनवले आहेत.

साक्षी धोनी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी आहे साक्षी. साक्षी ही बऱ्याचदा आयपीएलच्या सामन्यांच्यावेळी स्टेडियममध्ये पाहायला मिळते. काही वेळा मुलगी झिवाबरोबरही ती असते. पण साक्षी हीदेखील एक बिझनेसवूमन आहे. साक्षी इंटीरिअर डिजाइनर आहे आणि तिने ‘इंस्टा डेकोर इंडिया’नावाची फर्मही सुरु केली आहे. धोनीचे घर हे सात एकरांमध्ये वसलेले आहे. या घराचे इंटिरीअरदेखील साक्षीनेच केलेले आहे.

डोना गांगुली

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची पत्नी आहे डोना. सर्वांनाच माहिती आहे की डोना एक चांगली नृत्यांगना आहे. पण डोना एक डान्स अॅकादमीही चालवत आहे. या अॅकेडमीचे नाव 'दीक्षा मंजरी' असे नामकरण करण्यात आले आहे. या डान्स अकादमीमध्ये सर्व प्रकारचे भारतीय पारंपरिक नृत्यप्रकार शिकवले जातात. त्याचबरोबर योगा, चित्रकला, जलतरण आणि कराटेही या अकादमीमध्ये शिकवले जाते. या अकादमीची क्षमता दोन हजार एवढी आहे.

जेसिका ब्रॅटीच जॉन्सन

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेन जॉन्सनच्या पत्नी जेसिका ब्रॅटीच आहे. जेसिका ही उत्तम कराटे खेळाडू आहे. तिने 2006 साली झालेल्या विश्व कराटे अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. पण जेसिका ही फक्त खेळाडू नाही तर जेसिका हँडबॅग्स आणि घड्याळांचा बिझनेसही करत आहे.

Web Title: 'These' are the wives of cricketers are powerful businesswomen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.