Join us  

'या' 9 फलंदाजांनी करीयरमधील 100 व्या वनडे सामन्यात झळकावले शतक

भारताचा सलामीवीर शिखर धवनने करीयरमधील 100 व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकवून इतिहास रचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 8:09 PM

Open in App
ठळक मुद्दे2010 साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणा-या शिखरने करीयरमधील 13 वे शतक झळकावले.

जोहान्सबर्ग -     भारताचा सलामीवीर शिखर धवनने करीयरमधील 100 व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकवून इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील जोहान्सबर्गमधील वाँडर्स स्टेडियमवर चौथ्या सामन्यात शिखरने ही कामगिरी केली. शिखरने 109 धावा केल्या.  

2010 साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणा-या शिखरने करीयरमधील 13 वे शतक झळकावले. 99 चेंडूत धवनने शतकाला गवसणी घातली. 100 वी वनडे खेळताना शतक झळकावणारा तो जगातील नववा फलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेत पहिले शतक झळकावताना त्याने दोन षटकार आणि 10 चौकार लगावले. शिखर आता 32 वर्षांचा आहे.         

धवनने माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले. 1999 सालच्या वर्ल्डकपमध्ये याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 100 वा सामना खेळताना सौरवने 97 धावा केल्या होत्या. कसोटी मालिकेत अपयशी ठरल्यानंतर वनडेमध्ये शिखर धवन दमदार फलंदाजी करत आहे. कसोटी मालिका भारताने 2-1 ने गमावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आतापर्यंतच्या चार वनडेमध्ये  धवनने 35, 51,76 आणि 109 धावांची खेळी केली आहे.  याआधी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हीड वॉर्नरने मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारताविरुद्ध शंभरावा वनडे सामना खेळताना शतक झळकावले होते.  

100 व्या वनडेमध्ये शतक झळकावणा-या खेळाडूंची यादी 

- गॉर्डन ग्रीनीज - ख्रिस केन्स - युसूफ योहाना - कुमार संगकारा- ख्रिस गेल - मार्कस ट्रेसकॉथिक- रामनरेश सरवान- डेव्हीड वॉर्नर 

टॅग्स :शिखर धवनभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८