Join us

म्हणून क्रिकेटप्रेमींनी हार्दिक पांड्याची तुलना केली लेडी गागासोबत 

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या धडाकेबाज फलंदाजी आणि उपयुक्त गोलंदाजीमुळे क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मात्र हार्दिक पांड्याची एक गोष्ट त्याच्या फॅन्सच्या पचनी पडलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 19:17 IST

Open in App

नवी दिल्ली -  भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या धडाकेबाज फलंदाजी आणि उपयुक्त गोलंदाजीमुळे क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मात्र हार्दिक पांड्याची एक गोष्ट त्याच्या फॅन्सच्या पचनी पडलेली नाही. सध्या क्रिकेटमधून विश्रांती घेत असलेल्या हार्दिक पांड्याने आपली हेअरस्टाइल बदलली आहे. मात्र क्रिकेटप्रेमींना ही हेअरस्टाइल फारशी आवडलेली नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींनी त्याच्या लूकची तुलना थेट लेडी गागासोबत करण्यास सुरुवात केली आहे. तसेच विनोद कांबळीच्या मार्गावरून न जाण्याचा सल्लाही क्रिकेटप्रेमींनी पांड्याला दिला आहे.श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमधून हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे पांड्या सध्या आराम करत आहे. विश्रांतीच्या काळात पांड्याने ट्विटरवर आपल्या बदललेल्या लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. पांड्याचा हटके लूक पाहून क्रिकेटप्रेमींनी त्याच्या लूकची तुलना लेडी गागासोबत केली आहे. लेडी गागा ही आपल्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. 

दरम्यान, हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आल्याने क्रिकेटप्रेमींकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र मी संघ व्यवस्थापनाकडे विश्रांतीची मागणी केली होती, असे भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने स्पष्ट करत उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला होता. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. पूर्णपणे फिट वाटत नसल्यामुळे मी विश्रांती देण्याची विनंती केली होती. पांड्याचा सुरुवातीला संघात समावेश करण्यात आला होता, पण त्यानंतर त्याला विश्रांती देण्यात आली. बीसीसीआयने मात्र पांड्याला विश्रांती देण्याचे कारण स्पष्ट केले नव्हते.पांड्या म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी विश्रांतीची मागणी केली होती. माझे शरीर सामन्यासाठी तयार नव्हते. व्यस्त कार्यक्रमामुळे मला दुखापत झाली होती. पूर्णपणे फिट असेल तर खेळणे योग्य. मला विश्रांती मिळाल्यामुळे स्वत:ला नशिबवान समजतो. ब्रेकदरम्यान जिममध्ये ट्रेनिंग करणार असून फिटनेसमध्ये सुधारणा करण्यावर भर राहील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेबाबत उत्सुक आहे.’ पांड्या फिटनेस मिळवण्यासाठी एमसीएमध्ये जाणार आहे. माझी अष्टपैलू क्षमता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संघासाठी फरक स्पष्ट करणारी ठरेल, अशी आशा पांड्याने या वेळी व्यक्त केली. 

टॅग्स :क्रिकेटहार्दिक पांड्या