Join us  

ऑस्ट्रेलियन मानसिकतेची आहे गरज - झुलन गोस्वामी

भारतीय महिला संघ आयसीसी स्पर्धांमध्ये गेल्या काही वर्षांत बाद फेरीत धडक देत आहे. जेतेपद पटकविण्यात मात्र सतत अपयशी ठरतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 5:54 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘विश्वविजेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी भारतीय खेळाडूंनी आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी मानसिक कणखरता अंगी बाणवायला हवी,’ असे मत अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने व्यक्त केले आहे.भारतीय महिला संघ आयसीसी स्पर्धांमध्ये गेल्या काही वर्षांत बाद फेरीत धडक देत आहे. जेतेपद पटकविण्यात मात्र सतत अपयशी ठरतो. एकदिवसीय आंतरराष्टÑीय सामन्यात सर्वाधिक गडी बाद करणारी झुलन म्हणाली, ‘हा प्रश्न मानसिकतेशी निगडित असला तरी आमच्या खेळाडूंमध्ये जेतेपद मिळविण्याची क्षमता नाही, असे नाही. मागच्या तीन वर्षांत आम्ही चांगली कामगिरी केली, मात्र जेतेपदाने हुलकावणी दिली. अटीतटीच्या सामन्यात कसा विजय मिळवायचा, हे आॅस्ट्रेलियाला ठाऊक असल्याने हा संघ आमच्या पुढे आहे.’भारताने तिरंगी मालिका व टी२० विश्वचषक साखळी सामन्यात आॅस्ट्रेलियाला नमविले, पण दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात याच संघाकडून पराभूत झाले. स्वत:वर नियंत्रण मिळवून मानसिकरीत्या किती वर्चस्व गाजवता, यावर विजयी तंत्र विसंबून असते. आॅसी खेळाडू यात सरस ठरत असल्याचे झुलनने म्हटले.

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया