Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोहली, इम्रान खान यांच्यामध्ये खूपच साम्य, माजी फिरकीपटू अब्दुल कादीर यांचे मत

भारतीय कर्णधार विराट कोहली व पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यांच्यात अनेक बाबतीत साम्य असल्याचे पाकिस्तानचे माजी फिरकीपटू अब्दुल कादीर यांनी म्हटले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 04:30 IST

Open in App

कराची - भारतीय कर्णधार विराट कोहली व पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यांच्यात अनेक बाबतीत साम्य असल्याचे पाकिस्तानचे माजी फिरकीपटू अब्दुल कादीर यांनी म्हटले.कादीर म्हणाले की, जर मी विराटकडे कर्णधार म्हणून पाहिले, तर तो इम्रानसारखा आहे असे मी म्हणेन. इम्रान आपला आदर्श सर्वांसमोर ठेवायचे. जेणेकरून दुसऱ्यांनी त्यांचे अनुकरण करावे़ या दोघांची मी तुलना करणार नाही; मात्र कोहलीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे.कादीर यांच्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही कोहलीची तुलना विव्हियन रिचर्डस व इम्रान खान यांच्याशी केली होती.पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू अब्दुल कादीर म्हणाले, ‘दुसºयांकडून चांगली कामगिरी करवून घेण्याचे कौशल्य इम्रान खान यांच्याकडेहोते. कोहली अद्याप तेथेपर्यंत पोहोचला नाही; मात्र तो नेहमीच आव्हानाला सामोरे जाण्यासाठीपुढे असतो यात शंका नाही.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :विराट कोहली