Join us
Daily Top 2Weekly Top 5

Prithvi Shaw मध्ये 'शास्त्रीबुवां'ना दिसते 'या' तीन क्रिकेटवीरांची झलक

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटीही जिंकून दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 09:54 IST

Open in App

हैदराबाद : भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटीही जिंकून दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली.  या दोन्ही सामन्यांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉच्या कामगिरीवर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे भलतेच खूश झाले आहेत. त्यांनी पृथ्वीच्या शैलीत तीन दिग्गज फलंदाजांची झलक दिसत असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

ते म्हणाले,'' 18 वर्षीय पृथ्वीच्या फलंदाजीच्या शैलीत मला सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि वीरेंद्र सेहवाग या तिघांची झलक दिसत आहे.'' शास्त्री यांनी सांगितले की,'' पृथ्वीचा जन्म हा क्रिकेट खेळण्यासाठीच झालेला आहे. 8 वर्षांचा असल्यापासून तो मुंबईच्या मैदानांवर खेळत आहे. इथवर पोहोचण्यासाठी त्याचे प्रचंड मेहनत घेतली आहे. क्रिकेट चाहत्यांनाही त्याचा खेळ आवडतो. त्याच्या फलंदाजीत सचिन आणि सेहवागची झलक दिसते आणि तो चालतो तेव्हा त्यात लाराची झलक दिसते.''

'' पृथ्वी असाच एकाग्रतेने खेळत राहिला, तर त्याचे भविष्य उज्वल असेल,'' असेही शास्त्री म्हणाले. पृथ्वीने पहिल्या कसोटीत पदार्पणातच शतकी खेळी केली, तर दुसऱ्या कसोटीत त्याने 53 चेंडूंत 70 धावा केल्या. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद 33 धावा केल्या.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजपृथ्वी शॉरवी शास्त्री