Theft in BCCI office In Mumbai: क्रिकेट नियामक मंडळ, म्हणजेच BCCI च्या वानखेडे स्टेडियममधील कार्यालयात चोरी झाली आहे. ही चोरी पैशांची नाही, तर IPL जर्सीची आहे. या चोरीमागे कार्यालयातीलच एका कर्मचाऱ्यांचा हात आहे. फारुख अस्लम खान नावाच्या सुरक्षा रक्षकाने आयपीएल २०२५ च्या २६१ जर्सी चोरल्या. एका जर्सीची किंमत सुमारे २५०० रुपये आहे. अशाप्रकारे २.५२ लाख रुपयांचा माल चोरीला गेला आहे.
पोलिसांचा तपास सुरू
बीसीसीआय कार्यालयात झालेल्या चोरीबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, फारुख खान ऑनलाइन जुगार खेळतो. त्याने त्याच्या जुगाराच्या व्यसनासाठी या आयपीएल जर्सी चोरल्या. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, खानने सोशल मीडियाद्वारे हरियाणातील एका जर्सी डीलरशी संपर्कात होता. तो कुरिअरद्वारे त्याचे चोरीचे सामान पाठवत असे.
चोरी कशी पकडली गेली?
ही चोरीची घटना स्टॉक ऑडिटमध्ये उघडकीस आली. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि फारुख खान एका मोठ्या बॉक्ससह ऑफिसमधून बाहेर पडताना दिसला. पोलिसांनी या प्रकरणात हरियाणाच्या डीलरचीही चौकशी केली, त्यानंतर डीलरने सांगितले की, त्याला हे चोरीचे सामान असल्याचे माहित नव्हते. आरोपी खानने त्याला ऑफिसच्या नूतनीकरणादरम्यान स्टॉक क्लिअरन्स टीमचा भाग असल्याचे सांगितले होते.
१.२५ लाख रुपयांचा माल जप्त
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने १७ जुलै रोजी मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आतापर्यंत ५० जर्सी जप्त केल्या आहेत, ज्याची किंमत सुमारे १.२५ लाख रुपये आहे. पोलिसांनी फारुख खानचे बँक रेकॉर्ड तपासले, मात्र आरोपीने सर्व पैसे ऑनलाइन बॅटिंगमध्ये गमावल्याचे सांगितले. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Web Title: Theft at BCCI's Mumbai office; Security guard stole goods worth lakhs, investigation underway
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.