IPL 2025 Price Money: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज (०३ जून २०२५) आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. जगभरातील चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, विजेत्या आणि उपविजेत्या संघाला बक्षीस रूपात किती रक्कम मिळणार आहे, हे जाणून घेऊयात.
आयपीएल जिंकणारा संघ आणि उपविजेत्या संघाला २०२२ पासून समान रक्कम मिळते, असे म्हटले जाते. परंतु, याबाबात बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. बक्षीस रकमेत शेवटचा बदल तीन वर्षांपूर्वी करण्यात आला. त्यानुसार, विजेत्याला २० कोटी रुपये आणि उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये मिळतात. तर, क्लालिफायर- २ मधून बाहेर पडलेल्या संघांना ७ कोटी आणि एलिमिनेटर सामन्यात पराभूत झालेल्या संघाला ६.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातात.
कोणत्या संघाला किती रुपये मिळतात?
विजेता संघ- २० कोटी रुपये
उपविजेता संघ- १३.५ कोटी
क्लालिफायर २ पर्यंत पोहोचलेला संघ- ७ कोटी
एलिमिनेटर सामन्यात पराभूत झालेला संघ- ६.५ कोटी
ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती बक्षीस मिळते?
आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंवरही पैशांचा वर्षाव होतो. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी १०-१० लाख रुपये मिळतात. तर, इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन ठरलेल्या खेळाडूला २० कोटी रुपये दिले जातात.
Web Title: The team that wins the IPL trophy will be rich, the runner-up will also get 'so many' crores of rupees!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.