Join us

RCB ला IPL 2024 च्या प्ले ऑफमध्ये पोहोचवण्याची स्क्रीप्ट आधीच तयार! पाहा व्हायरल फोटो 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ची प्ले ऑफची शर्यत आता खऱ्या अर्थाने रंगतदार होताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 16:50 IST

Open in App

IPL 2024 , Point Table : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ची प्ले ऑफची शर्यत आता खऱ्या अर्थाने रंगतदार होताना दिसत आहे. काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२४ मध्ये बरोबर एका महिन्यानंतर दुसऱ्या विजयाची नोंद केली. २५ मार्चला RCB ने पहिला विजय मिळवताना पंजाब किंग्सला पराभूत केले होते आणि त्यानंतर त्यांना सलग सहा सामन्यांत हार पत्करावी लागली होती. काल २५ एप्रिलला त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा अश्वमेध रोखून दुसरा विजय मिळवला. या विजयानंतर RCB ने गुणतालिकेत ९ सामन्यांत २ विजय मिळवून ४ गुण कमावले आहेत आणि ते अजूनही दहाव्या क्रमांकावर आहेत.

RCB अजूनही प्ले ऑफमध्ये जाऊ शकतील का?IPL 2024 Point Table कडे लक्ष दिल्यास राजस्थान रॉयल्स ८ सामन्यांत ७ विजय मिळवून १४ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. त्यांचे प्ले ऑफ खेळण्याचे चान्स ९९ टक्के आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स यांच्या खात्यात प्रत्येकी १० गुण आहेत आणि ते टॉप चारमध्ये आहेत. यापैकी KKR ने एक सामना ( ७) कमी खेळल्याने त्यांचे प्ले ऑफ खेळण्याची शक्यता ८८ टक्के आहे. SRH व LSG यांनी ८ सामन्यांत १० गुण मिळवले असले तरी उर्वरित सामन्यांत प्रतिस्पर्धी लक्षात घेता या दोन्ही संघांची प्ले ऑफ खेळण्याची शक्यता अनुक्रमे ८४ व ७४ टक्के इतकी आहे.

चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स व गुजरात टायटन्स यांचे प्रत्येकी ८ गुण आहेत. चेन्नईने एक सामना ( ८) कमी खेळल्याने प्ले ऑफची शक्यता ३० टक्के आहे, तर DC व GT यांची अनुक्रमे ८ व ११ टक्के आहेत. मुंबई इंडियन्स ( ६ टक्के), पंजाब किंग्स ( १ टक्के) व बंगळुरू ( शून्य टक्के) यांची प्ले ऑफमध्ये खेळण्याची शक्यता कमीच आहे. MI च्या खात्यात ६ गुण आहेत, तर  PBKS व  RCB यांचे प्रत्येकी ४ गुण आहेत.

व्हायरल फोटोनुसार RCB प्ले ऑफ खेळणार...सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे आणि त्यानुसार RCB १४ गुणांसह प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहे. राजस्थान, हैदराबाद प्रत्येकी २० गुणांसह अव्वल दोन मध्ये राहतील, तर तिसऱ्या क्रमांकावरील कोलकाताच्या खात्यात १६ गुण असतील. त्यासाठी या फोटोत पद्धतशीर गणितही मांडले गेले आहे आणि आतापर्यंत त्याने लावलेला अंदाज खरा ठरल्याचा दावा केला गेला आहे. यापुढेही असेच घडले तर RCB प्ले ऑफ खेळू शकते.  

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरऑफ द फिल्ड