Join us

स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघ निवडीसाठी उपलब्ध आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 17:33 IST

Open in App

नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने ( Sandeep Lamichhane ) याला पाटण उच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. एका अल्पवयीन मुलीने स्टार क्रिकेटवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता आणि या लेग-स्पिनरला काठमांडू जिल्हा न्यायालयाने ८ वर्षांची शिक्षा सुनावली होती. पाटण उच्च न्यायालयाने बुधवारी संदीप लामिछाने याला 'निर्दोष' ठरवले. आता, तो आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघ निवडीसाठी उपलब्ध आहे. 

नेपाळ क्रिकेट संघासाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर ही खूप मोठी घटना आहे. कारण, संदीप हा त्यांचा स्टार फिरकीपटू आहे. नेपाळने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला असता तरी आयसीसीच्या नियमानुसार २५ मे पर्यंत संघात बदल करू शकतात. संदीपने नेपाळकडून ५१ वन डे व ५२ ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे ११२ व ९८ विकेट्स घेतल्या आहेत. रोहित पौडेल याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळणार आहे.  ४ जूनला नेपाळचा पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध टेक्सास येथे होणार आहे. त्यानंतर श्रीलंका ( १२ जून), दक्षिण आफ्रिका ( १५ जून ) व बांगलादेश ( १७ जून) यांच्याशी त्यांचा सामना आहे. 

नेपाळ संघ : रोहित पौडेल (क), आसिफ शेख, अनिल कुमार साह, कुशल भुर्तेल, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा, सागर ढकल, कमल सिंग आयरी

 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024नेपाळ