रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!

Most sixes in cricket history: कोण होता तो सिक्सर किंग, ज्याने ३० वर्षे आपला विक्रम अबाधित ठेवला? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 18:36 IST2026-04-08T18:35:12+5:302026-04-08T18:36:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
The Original Sixer King: Meet Arthur Wellard Who Hit 500+ Sixes Long Before Rohit Sharma Era | रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!

रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!

भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माच्या नावावर एकूण ६५० षटकारांची नोंद आहे. त्याने वेस्टइंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल, शाहिद आफ्रिदी यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंना मागे क्रिकेटविश्वात आपला ठसा उमटवला आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, रोहित शर्माच्या आधी एक असा खेळाडू होऊन गेला ज्याने षटकार मारण्याची कला अजरामर केली. हा खेळाडू इंग्लंडचे दिवंगत क्रिकेटपटू आर्थर वेलार्ड आहे. टी-२० क्रिकेट, पॉवरप्ले यांसारख्या गोष्टी नसतानाही आर्थर वेलार्ड यांनी षटकारांचा डोंगर उभा केला.

कोण होते आर्थर वेलार्ड?

आर्थर वेलार्ड यांचा जन्म ८ एप्रिल १९०२ रोजी झाला, त्यांना जुन्या काळातील सिक्सर किंग म्हणून ओळखले जात असे. ज्या काळात षटकार मारणे ही एक अत्यंत जोखीमपूर्ण आणि दुर्मिळ गोष्ट समजली जात असे, त्या काळात वेलार्ड यांनी आपल्या आक्रमक शैलीने संपूर्ण जगाला चकित केले. त्यांची प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील फलंदाजीची सरासरी जरी १९ इतकी माफक असली, तरी त्यांच्या नावावर ५०० हून अधिक षटकारांची नोंद आहे.

आर्थर वेलार्डची ऐतिहासिक कामगिरी

दरम्यान, २४ ऑगस्ट १९३८ रोजी समरसेट कडून खेळताना त्यांनी फ्रँक वूली यांच्या एकाच षटकात ५ षटकार ठोकले. विशेष म्हणजे, एकाच षटकात ५ षटकार मारण्याचा पराक्रम त्यांनी आपल्या कारकिर्दीत दोनदा केला. त्यांचा हा विक्रम तब्बल ३० वर्षे अबाधित राहिला, जो पुढे १९६८ मध्ये सर गॅरी सोबर्स यांनी एका षटकात ६ षटकार मारून मोडला. १९३५ च्या हंगामात त्यांनी ७२ षटकार ठोकले होते, हा विक्रम तब्बल ५० वर्षे कोणीही मोडू शकले नव्हते. अखेर १९८५ मध्ये इयान बोथम यांनी ८० षटकार मारून हा विक्रम मोडला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत चार वेगवेगळ्या हंगामात ५० हून अधिक षटकार मारण्याची किमया साधली होती.

पॉवर-हिटिंगचा पाया रचणारा खेळाडू

वेलार्ड केवळ फटकेबाजीसाठी प्रसिद्ध नव्हते, तर ते एक भेदक गोलंदाजही होते. ४१७ प्रथम-श्रेणी सामन्यांत त्यांनी तब्बल १,६०० हून अधिक विकेट्स घेतले. जरी त्यांना इंग्लंडकडून केवळ दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली, तरी काउंटी क्रिकेटमध्ये त्यांचे वर्चस्व निर्विवाद होते. ज्या काळात क्रिकेट अतिशय बचावात्मक खेळले जायचे, त्या काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या महान षटकारवीराचे ३१ डिसेंबर १९८० रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात  पॉवर-हिटिंगचा पाया रचणारा खेळाडू म्हणून त्यांचे नाव सदैव सुवर्णाक्षरात कोरलेले राहील.

Web Title : रोहित शर्मा नहीं, आर्थर वेलार्ड थे क्रिकेट के पहले 'हिटमैन'

Web Summary : रोहित शर्मा से पहले, इंग्लैंड के आर्थर वेलार्ड अपने आक्रामक पावर-हिटिंग से क्रिकेट पर हावी थे। उन्होंने एक ओवर में दो बार 5 छक्के लगाए और एक सीजन में सबसे अधिक छक्कों का रिकॉर्ड बनाया। वेलार्ड की विरासत हमेशा कायम रहेगी।

Web Title : Arthur Wellard: Cricket's first 'Hitman,' feared more than Rohit Sharma.

Web Summary : Before Rohit Sharma, England's Arthur Wellard, the 'Sixer King,' dominated cricket with his aggressive power-hitting. He hit 5 sixes in an over twice and held the record for most sixes in a season. Wellard's legacy as a pioneer of power-hitting endures.