Join us

IPL मध्ये लाखो-करोडोंची बोली लागते, पण खेळाडूला प्रत्यक्षात किती पैसे मिळतात? जाणून घ्या...

WPL Auction: कोणत्याही लीगमध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या पैशातून काही रक्कम वजा होते, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:05 IST

Open in App

Womens IPL: पुरुषांच्या IPL प्रमाणे महिलांच्या WPL(Women Premier League) च्या पहिल्या सत्राची धमाकेदार सुरुवात झाली आहे. वुमन प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात एकूण 87 खेळाडूंना खरेदी करण्यात आले. या लिलावात काही खेळाडूंना कोट्यवधी रुपयांची बोली लागली. लिलावातील सर्वात महागडी खेळाडू स्मृती मानधना होती, तिला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले. 

मंधानासोबतच टॉप 5 सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत 3 भारतीय आहेत. या यादीत एक ऑस्ट्रेलियन खेळाडूही आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की, या खेळाडूंना जेवढ्या पैशांत खरेदी केले जाते, तेवढे पैसे त्यांना मिळत नाहीत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, ज्या खेळाडूंना मोठी बोली लावून खरेदी केले जाते, त्यांना नेमकी किती रक्कम मिळते आणि किती वजा केली जाते. 

किती कपात होते?आयपीएल किंवा इतर लीगमध्ये जेव्हा लिलावात खेळाडूवर बोली लावली जाते, त्यातून टीडीएस कापला जातो. सामान्यतः भारतीय खेळाडूंना देय रकमेच्या 10% वर TDS कापला जातो. यानंतर, त्यांना आयकराच्या नियमांनुसार करदेखील भरावा लागतो. हा वार्षिक उत्पन्नावर अवलंबून आहे. टीडीएसची गणना लिलावाच्या पैशाच्या आधारे केली जाते.

पूर्ण पैसे मिळतात का?लिलाव ही आधारभूत किंमत असते, त्यानंतर कंपन्यांचे खेळाडूंसोबत वेगवेगळे करार असतात. यामध्ये सामन्यांची संख्या, किती सामने खेळायचे किंवा कोणत्या आधारावर पैसे मिळणार आदी माहिती असते. त्या आधारे खेळाडूंना कराव्यतिरिक्त पैसे मिळतात. मग त्या निव्वळ उत्पन्नाच्या आधारे आयकर भरावा लागतो.

परदेशी खेळाडूंसाठी काय नियम आहेत?परदेशी खेळाडूंना भारतात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 20% टीडीएस भरावा लागतो. त्याचबरोबर विदेशी खेळाडूंना TDS व्यतिरिक्त कोणताही कर भरावा लागत नाही. त्यांना भारतात मिळणाऱ्या उत्पन्नावरच कर भरावा लागतो.

टॅग्स :आयपीएल २०२२आयपीएल लिलावऑफ द फिल्ड
Open in App