'द हंड्रेड' लीगमध्ये काव्या मारन यांच्या सनरायझर्स लीड्स संघाने पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदचा समावेश केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावरून सोशल मीडियावर बहिष्काराची मागणी होत असतानाच, आता प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराज यांनी यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. भारताचा पैसा भारतातच राहिला पाहिजे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले आहे.
इंदूर येथे आयोजित सनातन प्रीमियर लीगदरम्यान माध्यमांशी बोलताना अनिरुद्धाचार्य यांनी काव्या मारन यांच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, पाकिस्तानी खेळाडूंना संधी देऊन आपण त्यांना आर्थिक बळ देत आहोत. याच पैशाचा वापर पाकिस्तान भविष्यात भारतावर क्षेपणास्त्रे डागण्यासाठी करू शकतो. भारतीय खेळाडूंना डावलून पाकिस्तानी खेळाडूंवर प्रेम का दाखवले जात आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
अनिरुद्धाचार्य महाराजांनी पुढे म्हटले की, संघात केवळ भारतीय क्रिकेटपटूंनाच स्थान दिले पाहिजे. भारतीय खेळाडूंना मानधन दिल्यास भारतीय रुपया अधिक मजबूत होण्यास मदत होईल. भारतातील टॅलेंटला जागतिक स्तरावर संधी मिळणे हाच देशाचा विकास आहे.यावेळी त्यांनी सनातन प्रीमियर लीगच्या आयोजनाचे कौतुक केले. खेळाचे महत्त्व पटवून देताना ते म्हणाले की, "भगवान श्रीकृष्णाने स्वतः विविध खेळांमध्ये सहभाग घेतला होता. अशा स्पर्धांमुळे तरुण पिढी शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहते. मुलांचे आरोग्य सुधारण्यासोबतच त्यांच्या भविष्यातील संधी उज्वल करण्यासाठी अशा लीग अत्यंत महत्त्वाच्या आहेत."
सोशल मीडियावर संतापाची लाट
काव्या मारन यांच्या संघाने अबरार अहमदला ताफ्यात घेतल्यापासून सोशल मीडियावर #BoycottSunrisersLeeds हा ट्रेंड जोर धरत आहे. अनिरुद्धाचार्य यांच्या विधानानंतर आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Web Summary : Aniruddhacharya criticized Kavya Maran's Sunrisers Leeds for including Pakistani Abrar Ahmed. He fears funds will fuel terrorism. He advocated for Indian players to strengthen the Rupee and boost national talent. This sparked #BoycottSunrisersLeeds trend.
Web Summary : अनिरुद्धाचार्य ने पाकिस्तानी अबरार अहमद को शामिल करने के लिए काव्या मारन की सनराइजर्स लीड्स की आलोचना की। उन्हें डर है कि धन आतंकवाद को बढ़ावा देगा। उन्होंने भारतीय खिलाड़ियों को रुपये को मजबूत करने और राष्ट्रीय प्रतिभा को बढ़ावा देने की वकालत की। इससे #BoycottSunrisersLeeds ट्रेंड शुरू हो गया।