Join us  

१३ चेंडूंत ६२ धावा! १५३ धावांचे लक्ष्य, इंग्लंडच्या Dawid Malan ने कुटल्या निम्म्याहून अधिक धावा, गोलंदाजांची धुलाई

The Hundred लीगमध्ये मंगळवारी चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 12:14 PM

Open in App

The Hundred लीगमध्ये मंगळवारी चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. नॉर्दन सुपरचार्ज्ड विरुद्ध ट्रेंट रॉकेट्स यांच्यातल्या या सामन्यात रॉकेट्सने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. १५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या रॉकेट्सकडून डेविड मलान ( Dawid Malan) याने एकट्याने नाबाद ८८ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ११ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी होती. 

प्रथम फलंदीज करताना सुपरचार्ज्डने ८ बाद १५२ धावा केल्या. त्यांचे सहा फलंदाज ६८धावांवर माघारी परतले होते, परंतु रोलॉफ व्हॅन डेर मेर्वे व डेव्हिड विसे यांनी दमदार खेळ करून संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. मेर्वेने ३० धावा केल्या, तर विसेने २७ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५० धावा चोपल्या. डॅनिएल सॅम्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ल्युक वूड व ल्युक फ्लेचर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात एलेक्स हेल्स व मलान यांनी पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. हेल्स २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मलानने अन्य फलंदाजांना काही संधीच दिली नाही. त्याने ४९ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८८ धावा करून विजय मिळवून दिला. 

टॅग्स :इंग्लंडटी-20 क्रिकेट
Open in App