१३ चेंडूंत ६२ धावा! १५३ धावांचे लक्ष्य, इंग्लंडच्या Dawid Malan ने कुटल्या निम्म्याहून अधिक धावा, गोलंदाजांची धुलाई

The Hundred लीगमध्ये मंगळवारी चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 12:14 PM2022-08-10T12:14:38+5:302022-08-10T12:23:18+5:30

whatsapp join usJoin us
The Hundred : Dawid Malan 88* fires TRENT ROCKETS to victory after David Wiese' NORTHERN Supercharged rescue act | १३ चेंडूंत ६२ धावा! १५३ धावांचे लक्ष्य, इंग्लंडच्या Dawid Malan ने कुटल्या निम्म्याहून अधिक धावा, गोलंदाजांची धुलाई

१३ चेंडूंत ६२ धावा! १५३ धावांचे लक्ष्य, इंग्लंडच्या Dawid Malan ने कुटल्या निम्म्याहून अधिक धावा, गोलंदाजांची धुलाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

The Hundred लीगमध्ये मंगळवारी चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. नॉर्दन सुपरचार्ज्ड विरुद्ध ट्रेंट रॉकेट्स यांच्यातल्या या सामन्यात रॉकेट्सने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. १५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या रॉकेट्सकडून डेविड मलान ( Dawid Malan) याने एकट्याने नाबाद ८८ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ११ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी होती. 

प्रथम फलंदीज करताना सुपरचार्ज्डने ८ बाद १५२ धावा केल्या. त्यांचे सहा फलंदाज ६८धावांवर माघारी परतले होते, परंतु रोलॉफ व्हॅन डेर मेर्वे व डेव्हिड विसे यांनी दमदार खेळ करून संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. मेर्वेने ३० धावा केल्या, तर विसेने २७ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५० धावा चोपल्या. डॅनिएल सॅम्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ल्युक वूड व ल्युक फ्लेचर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात एलेक्स हेल्स व मलान यांनी पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. हेल्स २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मलानने अन्य फलंदाजांना काही संधीच दिली नाही. त्याने ४९ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८८ धावा करून विजय मिळवून दिला. 

Web Title: The Hundred : Dawid Malan 88* fires TRENT ROCKETS to victory after David Wiese' NORTHERN Supercharged rescue act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.