Join us  

कसोटी मालिका : भारतापुढे क्लीन स्वीप टाळण्याचे लक्ष्य

पराभवामुळे हैराण झालेला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात यापूर्वी संघ निवडण्यात झालेल्या चुकांपासून बोध घेत क्लीन स्वीप टाळण्याच्या उद्देशाने उतरणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:40 AM

Open in App

जोहान्सबर्ग : पराभवामुळे हैराण झालेला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात यापूर्वी संघ निवडण्यात झालेल्या चुकांपासून बोध घेत क्लीन स्वीप टाळण्याच्या उद्देशाने उतरणार आहे.केपटाऊनमध्ये पहिला सामना ७२ धावांनी आणि सेंच्युरियनमध्ये दुसरा सामना १३५ धावांनी जिंकल्यानंतर यजमान संघाने यापूर्वीच मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विदेशात भारताचा कसोटी मालिकेतील हा पहिला पराभव आहे. त्यात २०१४ मध्ये आॅस्ट्रेलियात झालेल्या पराभवाचा समावेश नाही; कारण त्या वेळी महेंद्रसिंह धोनी पूर्णकालिक कर्णधार होता. त्याचसोबत भारताची २०१५ पासून सलग ९ सिरीज जिंकण्याची मालिका खंडित झाली. भारतीय संघाला ३-० ने पराभव स्वीकारावा लागला तरी कसोटी मानांकनातील अव्वल स्थान गमावणार नाही. आतापर्यंत संघ निवडीबाबत टीकाकारांचे लक्ष्य ठरल्यानंतर भारतीय संघाने अखेर भुवनेश्वर कुमारला खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात खेळणारा जसप्रीत बुमराह संघाबाहेर राहील.पाच वेगवान गोलंदाजांनी नेटमध्ये सराव केला तर भुवनेश्वर, ईशांत शर्मा, उमेश यादव व मोहम्मद शमी यांनी फलंदाजीचा सराव केला.भारतीय कर्णधार तिसºया लढतीत आणखी एक बदल करू शकतो. तीन दिवसांच्या ब्रेकनंतर रविवारपासून संघाने सरावास सुरुवात केली तेव्हापासून अजिंक्य रहाणेने सातत्याने फलंदाजीचा केला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये त्याने चार प्रदीर्घ सराव सत्रात फलंदाजीचा सराव केला. त्यामुळे त्याचे खेळणे जवळजवळ निश्चित आहे, कारण रोहित शर्माने चार डावांमध्ये केवळ ७८ धावा केल्या आहेत.रहाणेच्या पुनरागमनाव्यतिरिक्तही रोहितला वगळणार असल्याचे निश्चित नाही. भारत सहा फलंदाज व एक वेगवान गोलंदाज अष्टपैलूसह खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोहलीसाठी एकूण परिस्थिती बदललेली आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याने संघाला श्रीलंकेविरुद्ध ३-० ने विजय मिळवून देत इतिहास घडविला होता. आता ३-० ने मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत कुठल्याही भारतीय संघाने ३-० ने मालिका गमावलेली नाही.भारताने १९९२ पासून आतापर्यंत सहावेळा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केलेला आहे. १९९६-९७ मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताला २-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. २००६ नंतर गेल्या तीन दौºयात एक कसोटी जिंकणे किंवा ड्रॉ करण्यात यश मिळाले आहे.तसे बघता वाँडरर्सवर भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. भारताने या मैदानावर चार कसोटी (नोव्हेंबर १९९२, जानेवारी १९९७, डिसेंबर २००६ आणि डिसेंबर २०१३) सामने खेळले असून, एकही सामना गमावलेला नाही. भारताने येथे २००६ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली कसोटी सामना जिंकला होता. त्यात श्रीसंतने ९९ धावांच्या मोबदल्यात ८ बळी घेतले होते. ११ वर्षांनंतर भारतीय संघ त्याच प्रकारच्या हिरवळ असलेल्या व उसळी मिळणाºया खेळपट्टीवर खेळणार आहे.पीच क्युरेटर बेथुएल बुथेलेजीने रविवारी सांगितले होते की, खेळपट्टीवर हिरवळ कमी करण्यात येणार नाही. सामना प्रारंभ होण्यास २४ तासांचा अवधी शिल्लक आहे.कोहलीने ३४ कसोटी सामन्यात पूर्वीचा संघ कायम राखलेला नाही. या लढतीतही बदल बघायला मिळेल. सोमवारी आर. आश्विनने नेट््समध्ये फलंदाजी केली नाही तर रवींद्र जडेजाने प्रदीर्घ वेळ सराव केला. भारताने जर एका फिरकीपटूला खेळविले तर जडेजाला संधी मिळू शकते. फिरकीपटूविना सहा फलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला, तर कोहली अष्टपैलू वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्याला संधी देऊ शकतो. पार्थिव पटेलच्या खराब फॉर्मनंतरही त्याचे खेळणे निश्चित आहे. दुसºया बाजूचा विचार केला तर दक्षिण आफ्रिका संघाला कुठल्याच प्रकारची साशंकता नाही. सलामीवीर फलंदाज एडेन मार्कराम दुसºया कसोटी सामन्यात झालेल्या दुखापतीतून सावरला आहे. (वृत्तसंस्था)तसे दक्षिण आफ्रिका संघाला बेंच स्ट्रेंथची चाचणी घेण्याची संधी आहे. कारण यानंतर आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. सेंच्युरियन कसोटीनंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने नंबर वनवर नजर असल्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी त्यांना भारताचा ३-० ने पराभव करण्याव्यतिरिक्त आॅस्ट्रेलियाविरुद्ध २-० ने विजय मिळवावा लागेल. अशास्थितीत प्लेसिस दुसºया कसोटी सामन्यातील संघ कायम ठेवू शकतो. (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धी संघभारत :- विराट कोहली ( कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, पार्थिव पटेल.दक्षिण आफ्रिका : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), डीन एगर, एडेन मार्कराम, हाशिम आमला, तेम्बा बावुमा, थेनिस दे ब्रूने, क्विंटन डीकॉक, केशव महाराज, मोर्नी मोर्कल, ख्रिस मॉरिस, वेर्नोन फिलँडर, कागिसो रबाडा, एंडिले फेलुकवायो, लुंगी एन्गिडी, डुआने ओलिवियर.... याची कल्पनानाही : ग्रॅमी स्मिथविराट कोहली भारतासाठी प्रदीर्घ काळ कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळू शकेल किंवा नाही, हे निश्चित सांगता येत नसल्याचे दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ग्रॅमी स्मिथने म्हटले आहे. या स्टार फलंदाजाच्या नेतृत्वगुणांना संघव्यवस्थापनाने पुरेसे आव्हान दिलेले नाही, असेही स्मिथनेम्हटले आहे.स्मिथ म्हणाला, ‘त्याचे नेतृत्व बघितल्यानंतर तो भारतासाठी प्रदीर्घ काळ कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याचा पर्याय आहे किंवा नाही, हे मला सांगता येत नाही. यंदा भारतीय संघ मायदेशाबाहेर खेळणार आहे. कोहली दडपणाखाली कसे नेतृत्व करतो आणि मीडिया त्याचे अवलोकन कसे करते, यावरून त्याची कामगिरी ठरेल.’दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर संघ निवडीवरून कोहली टीकाकारांचे लक्ष्य ठरला आहे.स्मिथच्या मते, कोहलीजवळ त्याच्या निर्णयाला आव्हान देणाºया व्यक्तीची गरज आहे.कारकिर्दीत ११७ कसोटी व १९७ वन-डे सामने खेळणारा स्मिथ म्हणाला, ‘कोहलीला बघितल्यानंतर सपोर्ट स्टाफमध्ये त्याच्या निर्णयाला आव्हान देणाºया व्यक्तीची गरज असल्याचे वाटते. रणनीती आखण्याचा विचार केला तर तो पूर्ण सक्षम आहे. त्याला आपल्या खेळाची कल्पना आहे. अशापरिस्थितीत त्याला जर विचार करण्यास भाग पाडणारी व्यक्ती मिळाली तर तो चांगला कर्णधार ठरू शकतो.’स्मिथ पुढे म्हणाला, ‘कोहलीला संघसहकाºयांसोबत अधिक जुळवून घेण्याची गरज आहे. विश्व क्रिकेट व भारतीय क्रिकेटमध्ये विराटचे काय स्थान आहे, याची आम्हाला कल्पना आहे. त्याचा नकारात्मक प्रभाव सहकाºयांवर पडू शकतो.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८क्रिकेटभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका