Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या युवा गोलंदाजाकडून अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी, डावात दहा बळी

डावखुरा फिरकीपटू सिदाक सिंगने सीके नायडू चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करताना दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 16:22 IST

Open in App

मुंबई : डावखुरा फिरकीपटू सिदाक सिंगने सीके नायडू चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करताना दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली.  मुळचा मुंबईचा परंतु सध्या पुदुच्चेरी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिदाकने मणिपुरविरुद्धचा संपूर्ण संघ माघारी पाठवण्याचा पराक्रम केला आहे. त्याने 17.5 षटकांत 31 धावा देताना 10 विकेट घेतल्या. त्याने 7 षटकं निर्धाव टाकली. मणिपुरला केवळ 71 धावा करता आल्या.

सिदाकने 2015 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी वरिष्ठ क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याच्या गोलंदाजीची शैली दोनवेळा सदोष आढळली. त्याने मुंबईकडून 7 ट्वेंटी-20 सामने खेळे आणि सहा विकेट घेतल्या. सी के नायडु स्पर्धेतील या विक्रमानंतर तो पुन्हा चर्चेत आला आहे. या स्पर्धेत एका डावात 10 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज नाही. याआधी 2013 मध्ये रेल्वेच्या करण ठाकूरने सी के नायडू 25 वर्षांखालील स्पर्धेत अशी कामगिरी केली होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी कामगिरी करणारे दोनच गोलंदाज आहेत. जीम लेकर आणि अनिल कुंबळे. कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध एका डावात दहा विकेट घेतल्या होत्या. इंग्लंडच्या लेकर यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही डावांत प्रत्येकी 10-10 विकेट घेता आल्या असत्या, परंतु दुसऱ्या डावात त्यांना 9 विकेट घेता आल्या. 

टॅग्स :अनिल कुंबळे