Join us

सामन्यादरम्यान या क्रिकेटपटूचे अश्रू अनावर, कारण...

मैदानापासून पाच महिने दूर असेलल्या बेन स्टोकचे आज अश्रू अनावर झाले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 20:53 IST

Open in App

नवी दिल्ली - ब्रिस्टल वादामुळं क्रिकेच्या मैदानापासून तब्बल पाच महिने दूर असेलल्या बेन स्टोकचे आज अश्रू अनावर झाले होते.  न्यूझीलंड विरोधात सुरु असेलेल्या दुसऱ्या सामन्यान स्टोकने 63 धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. स्टोकच्या खेळीच्या बळावर इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत पाच सामन्याच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दुसरा वनडे सामन्यात इंग्लंडने सहा विकेटनं विजय मिळवला. या सामन्यात स्टोकनं फलंदाजी सोबतच उत्कृष्ट गोलंदाजी केली. 63 धावा आणि दोन बळी अशी अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यासाठी त्याला सामनावीरचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. 

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, सामन्यानंतर स्टोक म्हणाला की, पुनरागमन करताना मी कोणाला निरश करणार नव्हतो. चांगला खेळ करण्याचे माझ्यापुढे आव्हान होते. न्यूझीलंडने प्रथम फंलदाजी करुन 50 षटकांत 224 धावांचे लक्ष ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना आमच्या 86 धावांत 3 विकेट गेल्या होत्या. मॉर्गनसोबत 88 धावांची तर बटलरसोबत 55 धावांची भागिदारी महत्वाची ठरली. 

पुढे बोलताना तो म्हणाला की,  सर्व खेळाडू एकसंघ राहतात, मैदानाबाहेरही सर्वजन कनेक्ट असतात. त्यामुळं इतक्या दिवस दूर असून मी संघासोबत असल्यासारखे वाटत होते. जिंकल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी भावूक झालो होते. सामना जिंकल्यानंतरचा मैदानाबाहेर जाण्याचा तो क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. तो कायम माझ्या स्मरणात राहिल.