Indian team for the T20 World Cup : Breaking : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जग जिंकायला सज्ज; BCCIनं जाहीर केला संघ

Indian team for the T20 World Cup :  यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात कोणाला  संधी मिळतेय याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 09:14 PM2021-09-08T21:14:43+5:302021-09-08T21:21:34+5:30

whatsapp join usJoin us
Team India’s squad for ICC Men’s T20 World Cup announced, MS Dhoni named Team Mentor | Indian team for the T20 World Cup : Breaking : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जग जिंकायला सज्ज; BCCIनं जाहीर केला संघ

Indian team for the T20 World Cup : Breaking : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जग जिंकायला सज्ज; BCCIनं जाहीर केला संघ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian team for the T20 World Cup :  यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात कोणाला  संधी मिळतेय याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आतापर्यंत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या संघांनी आपापला वर्ल्ड कप स्क्वॉड जाहीर केला. पण, सर्वांना प्रतीक्षा होती ती टीम इंडियाच्या घोषणेची. टीम इंडियाच्या निवड समितीनं आज कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठीचा संघ निश्चित केला.  ( India have announced their 15-member squad for the ICC Men’s T20WorldCup  2021) 

कोरोना नियमांमुळे आयसीसीनं खेळाडूंची संख्या २३ वरून ३० इतकी नेण्यास मान्यता दिली आहे. यात सपोर्ट स्टाफचाही समावेश असणार आहे. संघ ३० पेक्षा अधिक जणांचा ताफा घेऊन जाऊ शकतो, परंतु त्याचा खर्च त्या त्या क्रिकेट संघटनेला करावा लागणार आहे. आर अश्विन या या संघातील सप्राईज पॅकेज ठरला. माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी या संघाला मेंटर असणार आहे,( MS Dhoni named Team Mentor for Team India in T20 World Cup ) युझवेंद्र चहलला डच्चू मिळाला आहे. 

भारताच्या संघात चार फलंदाज, दोन यष्टिरक्षक-फलंदाज, १ जलदगती अष्टपैलू, २ फिरकी अष्टपैलू, ३ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज असणार आहेत. २०१७मध्ये आर अश्विन टीम इंडियाकडून अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता आणि आता तो थेट वर्ल्ड कप खेळणार आहे.

भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी( TEAM - Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Rahul Chahar, Ravichandran Ashwin, Axar Patel, Varun Chakravarthy, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Mohd Shami.) 

राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर

 

भारतीय संघाचे वेळापत्रक
२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३१ ऑक्टोबर -   भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३ नोव्हेंबर -    भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
५ नोव्हेंबर - भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
८ नोव्हेंबर - भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता
उपांत्य फेरीचे सामने  -१० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर 
अंतिम सामना - १४ नोव्हेंबर

  • पाकिस्तानचा संघ ( Pakistan squad )  - बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन,  शाहिन शाह आफ्रिदी 
  • ऑस्ट्रेलियाचा संघ ( Australia squad ) - अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), अ‍ॅश्टन अ‍ॅगर, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा
  • न्यूझीलंडचा संघ ( New Zealand Squad)  -  केन विलियम्सन ( कर्णधार), मार्टिन गुप्तील, डेव्हन कॉनव्हे, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, टीम सेईफर्ट, मिचेल सँटनर, ईश सोढी, ग्लेन फिलिप्स, जिमी निशॅम, डेरिल मिचेल, कायले जेमिन्सन, लॉकी फर्ग्युसन, मार्क चॅपमॅन, टॉम एस्टल. राखीव खेळाडू - अॅडम मिल्ने  

Web Title: Team India’s squad for ICC Men’s T20 World Cup announced, MS Dhoni named Team Mentor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.