भारतात निवडणुका झाल्यावर टीम इंडिया पाकिस्तानात खेळायला येईल: शोएब अख्तर

या वर्षी होणार्‍या आशिया कप २०२३ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 13:00 IST2023-03-07T12:56:37+5:302023-03-07T13:00:52+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Team India will play in Pakistan after elections in India says Shoaib Akhtar | भारतात निवडणुका झाल्यावर टीम इंडिया पाकिस्तानात खेळायला येईल: शोएब अख्तर

भारतात निवडणुका झाल्यावर टीम इंडिया पाकिस्तानात खेळायला येईल: शोएब अख्तर

या वर्षी होणार्‍या आशिया कप २०२३ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला या स्पर्धेसाठी पाकिस्तानला न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर वातावरण तापले आहे. भारताच्या पवित्र्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात ( PCB) खळबळ उडाली आहे. पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा आणि विद्यमान अध्यक्ष नजम सेठी यांनीही भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती. या संदर्भात आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केले आहे. 

हमारी भी रिस्पेक्ट है! वर्ल्ड कप खेळायला भारतात जाणार नाही; पाकिस्तानी खेळाडूची BCCI ला धमकी

एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीमध्ये शोएब अख्तर याने पाकिस्तान आणि टीम इंडिया संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 'सध्या क्रिकेटमध्ये राजकारण सुरू आहे. जय शाह यांनी हा निर्णय घेतला आहे, पॉलिटिकल डिप्लोमसी सुरू आहे. याअगोदरही असे झाले होते. आता काही महिन्यातच भारतात निवडणुका होणार आहेत. या निवडणुका झाल्यानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळायला येऊ शकते असं मला वाटते, अशी प्रतिक्रिया शोएब अख्तर याने दिली आहे. 

बीसीसीआय (BCCI) आयसीसीला सर्वात जास्त फंडींग करत आहे, त्यामुळे आयसीसीला त्यांचे ऐकावं लागतं. त्यामुळे जय शाह यांनी हा निर्णय घेतला आहे, आता भारतात निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या संपल्यानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळायला येऊ शकते. तर पाकिस्तान टीमला भारतामध्ये खेळायला जावं लागणारच आहे, असंही अख्तर म्हणाला. 

Web Title: Team India will play in Pakistan after elections in India says Shoaib Akhtar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.