Join us  

इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडिया राहणार आठ दिवस क्वारंटाईन, कुटुंबाला सोबत घेऊन जाण्यास परवानगी

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडला टक्कर देणार आहे. १८ जूनपासून साऊदम्पटन मैदानावर हा अंतिम सामना रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 3:57 AM

Open in App

नवी दिल्ली : विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी व त्यानंतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शुक्रवारी भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने संघनिवड केली होती. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियासाठी कडक क्वारंटाईन नियमावली तयार केली आहे. (Team India will be quarantined for eight days before the tour of England)विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडला टक्कर देणार आहे. १८ जूनपासून साऊदम्पटन मैदानावर हा अंतिम सामना रंगणार आहे. भारतातील कोरोनाची स्थिती पाहता, बीसीसीआयला कोणताही धोका पत्करायचा नाही. यासंदर्भात बीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले, विराटच्या नेतृत्वाखालील संघासाठी क्वारंटाईन कालावधी दोन टप्प्यात असेल. २५ मेपासून हे खेळाडू भारतात बायोबबलमध्ये राहतील. त्यानंतर २ जूनला इंग्लंडला पोहोचल्यानंतर तेेथेही दहा दिवस क्वारंटाईन असतील.विशेष विमानाने हे खेळाडू एका बबलमधून दुसऱ्या बबलमध्ये जातील. इंग्लंडला पोहोचल्यानंतर हे खेळाडू सराव करू शकतात. यादरम्यान त्यांच्या चाचण्याही होतील. तीन महिन्यांच्या मोठ्या दौऱ्यामुळे भारतीय खेळाडूंना त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली आहे.वृत्तसंस्था एएनआयच्या मते, प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या नेतृत्वात २० सदस्यीय भारतीय संघ २५ मे रोजी मुंबईत येईल. ८ दिवस ते इथे तयार केलेल्या बायोबबलमध्ये राहणार आहेत. यावेळी दोन-तीन वेळा त्यांची कोरोना चाचणी होईल.दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेदरम्यान माघार घेणारा रवींद्र जडेजा, हनुमा विहारी यांच्यासह अनेक खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ४ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेट सट्टेबाजीभारतीय क्रिकेट संघ