आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. एका बाजूला आयपीएल स्पर्धा पार पाडण्याची तयारी सुरु असताना दुसऱ्या बाजूला बीसीसीआय निवड समितीनं इंग्लंड दौऱ्यासाठी संघ बांधणीचा विचारही सुरु केलाय. या दौऱ्यात बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर असलेल्या इशान किशनला संधी मिळणार असल्याचे समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी तो इंग्लंड दौऱ्यावरील प्लॅनिंगचा भाग नव्हता, पण...
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील BCCI निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी खास प्लान आखल्याचे समजते. भारतीय 'अ' संघात त्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. भारत 'अ' संघ या दौऱ्यात इंग्लंड लायन्स विरुद्ध २ अनौपचारिक कसोटी सामने खेळणार आहे. या दोन सामन्यातील पहिला सामना ३० मे रोजी नियोजित आहे. ईशान किशन आधी इंग्लंड दौऱ्यातील प्लॅनिंगचा भाग नव्हता. पण आयपीएलमधील दोन खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्याच्यासाठी संधी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
रोहित-विराटसोबतच्या जुन्या आठवणींसह गब्बरनं शेअर केला मैत्रीचा खास किस्सा
या दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे निर्माण झालीये संधी
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबी संघाचे नेतृत्व करताना दिसलेला रजत पाटीदार आणि याच संघातील देवदत्त पडिक्कल दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळेच इशान किशनला भारत 'अ' संघासोबत इंग्लंडची फ्लाइट पकडण्याची एक संधी निर्माण झालीये. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणाऱ्या १४ सदस्यीय भारत 'अ' संघात आयपीएल प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाद झालेल्या संघातील खेळाडूंचा विचार करण्यात आल्याचेही समजते.
करुण नायरलाही मिळू शकते संधी
इशान किशनशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खास छाप सोडणाऱ्या करून नायरलाही इंग्लंड दौऱ्यावर संधी मिळू शकते. तोही भारतीय 'अ' संघाकडून खेळताना दिसू शकते. याशिवाय नीतीश कुमार रेड्डी, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, शार्दुल ठाकूर, तनुश कोटियान, आकाश दीप, खलील अहमद, अंशुल कंबोज आणि मानव सुथार या खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते.