Join us  

टीम इंडियाचे अव्वल स्थान कायम, आयसीसी कसोटी क्रमवारी; न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर

मागच्यावर्षी भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ ने आणि त्यानंतर इंग्लंडला ३-१ ने पराभूत केले. न्यूझीलंडने वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा प्रत्येकी २-० ने पराभव केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 6:06 AM

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी संघांची वार्षिक क्रमवारी गुरुवारी जाहीर केली. त्यानुसार भारत मागच्यावर्षीसारखाच अव्वल स्थानावर कायम आहे. भारताचे १२१ गुण असून दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडचे १२० गुण आहेत. भारताने २४ कसोटी सामन्यांत २९१४ गुणांची कमाई केली आहे. न्यूझीलंडने १८ सामन्यांत दोन रेटिंग गुणांसह २१६६ गुणांची कमाई केली आहे.मागच्यावर्षी भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ ने आणि त्यानंतर इंग्लंडला ३-१ ने पराभूत केले. न्यूझीलंडने वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा प्रत्येकी २-० ने पराभव केला होता. आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीनुसार वार्षिक अपडेटचा २०१७-१८ च्या निकालाच्या जागी समावेश करण्यात येणार आहे. मे २०२० पासून झालेल्या सर्व सामन्यांसाठी शंभर, तर दोन वर्षांआधी झालेल्या सामन्यांसाठी ५० टक्के रेटिंग देण्यात आले आहे.इंग्लंड १०९ रेटिंगसह तिसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया एका गुणांनी मागे असल्यामुळे चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानचे ९४ गुण असून हा संघ पाचव्या तसेच ८४ गुण असलेला वेस्ट इंडिज संघ सहाव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका सातव्या आणि श्रीलंका आठव्या स्थानावर आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून साऊदम्पटन येथे विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळविला जाईल.

बांगलादेशची कामगिरी ढेपाळली -दक्षिण आफ्रिका संघाने ८० गुणांसह सातवे आणि श्रीलंका संघाने ७८ गुणांसह आठवे स्थान घेतले. मात्र बांगलादेश संघ मागच्या काही वर्षांपासून खराब कामगिरी करीत आहे. हा संघ नवव्या, तर झिम्बाब्वे दहाव्यास्थानी घसरला आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघविराट कोहलीक्रिकेट सट्टेबाजी