Join us  

विंडीजला नमविण्यासाठी टीम इंडिया सज्ज; दोन सामन्यांची मालिका आजपासून

टी२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर कसोटी मालिका जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 5:55 AM

Open in App

नॉर्थ साऊंड: भारतीय संघाची वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारपासून सुरू होत आहे. यापूर्वी झालेल्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात भारताने वर्चस्व राखले. सराव सामन्यात काही खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष होते. त्यानुसार चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, उमेश यादव यांनी चमक दाखवून कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. त्यामुळे मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.टी२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर कसोटी मालिका जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. सर विव्हियन रिचर्ड्स स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पूरक मानली जाते.भारताने हा सामना जिंकल्यास कर्णधार म्हणून कोहलीचा २७ वा कसोटी विजय ठरेल आणि तो धोनीची बरोबरी करेल. या सामन्यात विराटने शतक ठोकल्यास कर्णधार म्हणून १९ व्या शतकासह तो रिकी पॉंटिंगच्या विक्रमाशीही बरोबरी करेल. कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मुख्य चिंता केमार रोच तसेच शेनन गॅब्रियल यांच्याकडून नव्या चेंडूने मिळणारे आव्हान हेच असेल. खेळपट्टीवर उसळी व वेग असल्यास भारत ४ गोलंदाजांसह खेळेल. अश्विन, कुलदीपपैकी एकाला संधी मिळू शकेल. फलंदाजीत संतुलन साधताना मात्र कोहलीची डोकेदुखी वाढेल. अशावेळी रहाणे व रोहित यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागेल. रवींद्र्र जडेजा अष्टपैलू म्हणून संघात राहील. मयांक अग्रवालसोबत सलामीला कोण, हे देखील कोडे आहे.विंडीजकडे शाय होप, जॉन कॅम्पबेल व शिमरोन हेटमायर हे गुणवान युवा खेळाडू आहेत. तसेच डेरेन ब्राव्हो याच्या ५२ कसोटीत ३५०० धावा आहेत. (वृत्तसंस्था)भारतीय खेळाडू नव्या रुपात भारतीय संघातील खेळाडू एका वेगळ्याच रूपात दिसणार आहेत. यापूर्वी कसोटी सामन्यात पांढºया रंगाचा गणवेश आणि बीसीसीआयचा लोगो असायचा. आता टी शर्टवर नंबर आणि नावदेखील असेल. खेळाडूंचा हा नवा लूक इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला. याआधी झालेल्या सराव सामन्यात भारतीय खेळाडू नव्या पद्धतीची जर्सी परिधान करुन खेळले होते.सामना: सायंकाळी ७ वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार)

टॅग्स :भारत